Saturday, November 8, 2025

एसटीने गणपतीला कमावले आणि दिवाळीत गमावले! कारण काय?

एसटीने गणपतीला कमावले आणि दिवाळीत गमावले! कारण काय?

एसटीला ऑक्टोबरमध्ये १८० कोटींचा फटका

तिकीट महसुलात सरासरी ६ कोटींची दैनंदिन तूट

मुंबई : दिवाळीसारख्या गर्दीच्या हंगामातही राज्य परिवहन महामंडळाला आपले उद्दिष्ठ गाठता आले नसून दैनंदिन वाहतूक अहवालानुसार सवलत मूल्य रक्कमेसह प्रवासी तिकिटांमधून मिळणाऱ्या महसुलात तब्बल सहा कोटी रुपयांची दैनंदिन तूट नोंदवली गेली आहे, ऑक्टोबर महिन्यातच एसटी सुमारे १८० कोटी रुपयांचा फटका बसला आहे.

‘एसटी ना नफा–ना तोटा’ या तत्वावर चालविली जाते, पण प्रत्यक्षात ती सतत तोट्यातच आहे. या आर्थिक चणचणीमुळे दर महिन्याला सरकारकडे मदतीची याचना करावी लागते, ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे.

यावर्षी झालेल्या १४.९५ टक्के भाडेवाढीचा विचार करता प्रतिदिन सुमारे सरासरी ३३ कोटींचे उत्पन्न मिळायला हवे होते; परंतु ऑक्टोबरमध्ये हे उत्पन्न केवळ २६.५५ कोटी इतकेच राहिले. त्यामुळे तुलनेत मोठी तूट निर्माण झाली असून, हा आकडा १००० कोटींपेक्षा जास्त अपेक्षेवर १८० कोटींनी कमी आहे.

अकरा हजार कोटींच्या संचित तोट्याच्या गर्तेत अडकलेली एसटी आणखी खोलवर अडकण्याच्या स्थितीत आहे. तिकीट विक्रीतील घट का होते आहे, याचा अभ्यास करण्यासाठी अनुभवी अधिकाऱ्यांचा स्वतंत्र गट तातडीने नेमण्याची मागणी होत आहे.

Comments
Add Comment