Friday, November 7, 2025

Vicky Kaushal-Katrina Kaif : मुलगा झाला रे! 'विकी-कॅट'च्या घरी छोट्या 'छावा'ची दमदार एन्ट्री!

Vicky Kaushal-Katrina Kaif  : मुलगा झाला रे! 'विकी-कॅट'च्या घरी छोट्या 'छावा'ची दमदार एन्ट्री!

मुंबई : बॉलिवूडचे सर्वात लोकप्रिय जोडपे, कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि विकी कौशल (Vicky Kaushal) यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा आणि आनंदाचा क्षण नुकताच आला आहे! लग्नानंतर सुमारे तीन वर्षांनी या दोघांच्या घरी एका गोंडस 'राजपुत्रा'चे आगमन झाले आहे. कतरिनाने मुलाला जन्म दिला असून, 'कौशल कुटुंबात छोट्या 'छावा'ची दमदार एन्ट्री' झाली आहे. या बातमीमुळे संपूर्ण बॉलिवूडमध्ये आणि त्यांच्या जगभरातील चाहत्यांमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे. कतरिना आणि विकी या दोघांच्याही जवळच्या सूत्रांनी ही आनंदाची बातमी निश्चित केली आहे.

 
View this post on Instagram
 

A post shared by Vicky Kaushal (@vickykaushal09)

विकी कौशल बनला 'बाप'!

'छावा' आणि 'सॅम बहादूर' सारख्या चित्रपटांमधून आपल्या अभिनयाची छाप सोडणाऱ्या अभिनेता विकी कौशलसाठी हा क्षण खूप खास आहे. त्याचे चाहते सोशल मीडियावर 'विकी बाप झाला' म्हणत शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. कतरिना आणि बाळ दोघेही पूर्णपणे सुखरूप असून, त्यांच्यावर डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली उपचार सुरू आहेत.कतरिना आणि विकी कौशल यांनी डिसेंबर २०२१ मध्ये राजस्थानमध्ये अतिशय खासगी आणि शाही विवाह सोहळ्यात लग्न केले होते. तेव्हापासून त्यांच्या कुटुंबात नव्या पाहुण्याच्या आगमनाची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. सोशल मीडियावर या जोडप्यावर शुभेच्छांचा आणि अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला आहे. अनेक सेलिब्रिटी आणि त्यांचे चाहते 'विकी-कॅट'ला त्यांच्या आयुष्यातील या नव्या प्रवासासाठी शुभेच्छा देत आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा