Friday, November 7, 2025

सुरेश रैना, शिखर धवनची कोट्यवधींची मालमत्ता ‘ईडी’कडून जप्त

सुरेश रैना, शिखर धवनची कोट्यवधींची मालमत्ता ‘ईडी’कडून जप्त

मुंबई :  १,००० कोटी रुपयांच्या सट्टेबाजी प्रकरण ईडीने माजी क्रिकेटपटू सुरेश रैना आणि शिखर धवन यांच्या मालमत्ता जप्त केल्या आहेत. रैनाच्या नावावर असलेल्या ६.६४ कोटी रुपयांच्या म्युच्युअल फंड गुंतवणुकी व धवनच्या मालकीची ४.५ कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता जप्त करण्याचा तात्पुरता आदेश जारी करण्यात आला आहे.

१xBet या प्लॅटफॉर्म आणि त्याच्या सरोगेट ब्रँड १xBat आणि १xBat स्पोर्टिंग लाइन्सशी संबंधित बेकायदेशीर ऑफशोअर बेटिंग ऑपरेशन्सच्या चौकशीचा भाग म्हणून ईडीने २००२ च्या मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदाच्या तरतुदींनुसार रैना व धवन यांच्या मालकीची ११.१४ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. ईडीच्या चौकशीत असे आढळून आले आहे की या क्रिकेटपटूंनी 1xBet च्या जाहिरातीसाठी जाणूनबुजून परदेशी संस्थांसोबत करार केले होते. या प्रकरणी ईडीने यापूर्वी युवराज सिंग. रॉबिन उथप्पा आणि अभिनेता सोनू सूद, उर्वशी रौतेला, मिमी चक्रवर्ती (तृणमूल काँग्रेसचे माजी खासदार) आणि अंकुश हाजरा (बंगाली अभिनेता) यांची चौकशी केली आहे.

Comments
Add Comment