ठाणे : कॅडबरी जंक्शन उड्डाणपुलाजवळ कंटेनरचा अपघात झाला. या अपघातात कंटेनर चालक जखमी झाला. जखमी चालकाला ठाणे जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. चालकावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
कामता पाल (५०) असे अपघातात जखमी झालेल्या कंटेनर चालकाचे नाव आहे. कामता पाल हा रविवारी कळंबोलीहून गुजरातच्या दिशेने कंटेनर घेऊन निघाला होता.
कंटेनर मुंबई- नाशिक महामार्गावरील कॅडबरी जंक्शन जवळील उड्डाणपुलाच्या उतरणीवर असताना अपघात झाला. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाला. कंटेनर रस्ता दुभाजकाला अर्थात डिव्हायडरला धडकला. अपघाताची माहिती मिळताच राबोडी पोलीस, वाहतूक पोलीस, २ हायड्रा मशीन, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी, अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले. जखमी चालकाला रुग्णालयात दाखल केल्यानंतर अपघातग्रस्त वाहन रस्त्यावरुन हटवून वाहतूक सुरळीत करण्यात आली.






