नवी दिल्ली : दरवर्षी १ नोव्हेंबर हा दिवस जागतिक वर्ल्ड वेगन डे म्हणून साजरा केला जातो. जगभरातील नागरिकांनी शाकाहारी जीवन जगावे या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो. वन्यप्राणी , पशूपक्षी यांना कोणतीही हानी न पोहचवता जीवन जगण्याचा ध्यास घेतलेले म्हणजे व्हीगन. गेल्या काही वर्षांपासून शाकाहारी जेवण हे अनेकांच्या पसंतीचा भाग बनत आहे. मोठ्या कलाकारपासून ते खेळाडूंपर्यंत सर्वजण शाकाहारी जेवणाची निवड करताना दिसून येतात. संशोधनातून शाकाहारी जेवणाचे अनेक फायदे आहेत असे समोर आले आहे . अनेक आजारापासून दूर राहण्यासाठी शाकाहारी जेवणाचे सेवन केले पाहिजे. शाकाहारी जेवणाचे महत्व पटवून देण्यासाठी १ नोव्हेंबर हा दिवस वर्ल्ड वेगन डे म्हणून साजरा केला जातो.
"द व्हेजिटेरियन सोसायटी यूके" चे सदस्य डोनाल्ड वॅटसन व एलिस श्रीगले यांनी १९४४ मध्ये क्लबबरोबर मिळून आहारातून मांसाहार काढून टाकण्यास व प्राण्यांपासून बनलेली उत्पादने आणि पदार्थ टाळण्याचा निर्णय घेतला. मात्र , अनेकांनी त्यावेळी या गोष्टीस विरोध केला , या दोघांनी " द व्हेगन सोसायटी स्थापन केली. त्यानंतर १९९४ मध्ये "द व्हेगन सोसायटी"च्या ५० व्या वर्धापनदिनानिम्मित यूके सेलिब्रिटी आणि व्हेगन सोसायटी तत्कालीन अध्यक्ष लुईस यांनी १ नोव्हेंबरला हा वर्ल्ड विगन डे म्हणून घोषित केला. या दिवसाच्या बाबतीत तारखेचा निर्णय घेताना , १९९४ मध्ये वेगन सोसायटीची निर्मिती झाली हे सर्वांना माहिती आहे. मात्र ती कोणत्या तारखेला झाली हे माहिती नव्हते त्यामुळे हॅलोविन आणि डेड ऑफ द डेचे निमित्त साधत vaulis यांनी १ नोव्हेंबर ही तारीख निवडली. म्हणून आजच्या दिवशी "वर्ल्ड वेगन डे" साजरा केला जातो.






