Saturday, November 22, 2025

राजस्थानमध्ये पाच दहशतवाद्यांना अटक, सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर

राजस्थानमध्ये पाच दहशतवाद्यांना अटक, सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर

राजस्थान: राजस्थान दहशतवाद विरोधी पथकाने जोधपूर, बारमेर आणि करौलीसह अनेक जिल्ह्यांमध्ये छापे टाकून पाच दहशतवाद्यांना अटक केली आहे. दहशतवाद विरोधी पथकाने घटनास्थळावरून मोबाईल फोन आणि दहशतवादी साहित्य जप्त केले असून जयपूरमधील एटीएस मुख्यालयात आरोपींची चौकशी सुरू आहे. ही कारवाई शुक्रवार, ३१ ऑक्टोबर रोजी करण्यात आली.

कारवाई गुप्तचरांनी दिलेल्या माहितीवर आधारित होती. एटीएस पथक गेल्या काही दिवसांपासून अनेक व्यक्तींच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवून होते. ज्यामुळे ही मोठी कारवाई करण्यात यश मिळाले आहे. या पार्श्वभूमीवर राज्यभरातील सुरक्षा यंत्रणांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. खबरदारीचे उपाय करण्यात आले आहेत.

पोलिस महानिरीक्षक विकास कुमार म्हणाले की, अटक केलेल्या आरोपींमध्ये बाडमेरचा रहिवासी उस्मान उमर, जोधपूरचा रहिवासी मसूद, करौलीचा रहिवासी मोहम्मद अयुब, बाडमेरचा रहिवासी मोहम्मद जुनैद आणि बसीर यांचा समावेश आहे. या सर्वांना अधिक चौकशीसाठी जयपूर येथील एटीएस मुख्यालयात नेण्यात आले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >