Saturday, November 1, 2025
Happy Diwali

आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक २०२५ अंतिम सामन्यासाठी पंचांची घोषणा

आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक २०२५ अंतिम सामन्यासाठी पंचांची घोषणा
नवी मुंबई: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) ने भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील विश्वचषक २०२५ च्या अंतिम सामन्यासाठी पंच आणि सामना अधिकाऱ्यांच्या (Match Officials) नावांची घोषणा केली आहे. या स्पर्धेतील सर्व सामने महिला पंच आणि सामना अधिकाऱ्यांनी हाताळण्याची ऐतिहासिक परंपरा अंतिम सामन्यातही कायम राहणार आहे. अंतिम सामन्यासाठी निवडलेले अधिकारी: ऑन-फिल्ड पंच एलोइस शेरिडन (ऑस्ट्रेलिया) ऑन-फिल्ड पंच जॅकलीन विलियम्स (वेस्ट इंडीज) थर्ड अंपायर सू रेडफर्न (इंग्लंड) फोर्थ अंपायर निमाली परेरा (श्रीलंका) सामना रेफरी मिशेल परेरा (श्रीलंका) भारत आणि दक्षिण आफ्रिका हे दोन्ही संघ पहिल्यांदाच महिला एकदिवसीय विश्वचषकाचा किताब जिंकण्यासाठी मैदानात उतरणार आहेत. एलोइस शेरिडन आणि जॅकलीन विलियम्स यांनी यापूर्वी उपांत्य फेरीत (साउथ आफ्रिका वि. इंग्लंड) पंच म्हणून काम पाहिले होते. जॅकलीन विलियम्स यांनी या स्पर्धेच्या साखळी फेरीतील भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामन्यातही पंच म्हणून काम केले होते. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी ३:०० वाजता सुरू होईल.
Comments
Add Comment