Friday, October 31, 2025
Happy Diwali

मुंबई महापालिकेच्या घरांच्या लॉटरीला अल्प प्रतिसाद

मुंबई महापालिकेच्या घरांच्या लॉटरीला अल्प प्रतिसाद

नोंदणी केली १७ हजारांहून अधिक, अनामत रक्कम भरली केवळ २२९ अर्जदारांनी

मुंबई  : सर्वसामान्य माणसांना मुंबईत घर घेणे शक्य व्हावे म्हणून महापालिकेच्यावतीने ४२६ घरांसाठी काढलेल्या लॉटरीसाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत असून आतापर्यंत १७ हजार ५३८ अर्जदारांनी महापालिकेच्या संकेतस्थळावर नोंदणी केली आहे. मात्र, यापैकी ११ हजार अनामत केवळ २२९ अर्जदारांनी भरलेली आहे. त्यामुळे आतापर्यंत नोंदणी शुल्क भरलेल्या केवळ ३० ते ३५ टक्के अर्जदारांनी अनामत रक्कम भरल्याने नोंदणी करणाऱ्यांकडून फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येत आहे.

मुंबईचा विकास आराखडा तयार करून परवडणारी घरे बांधण्याचा संकल्प केल्यानंतर आता ही प्रत्यक्षात याचा लाभ मुंबईकरांना उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेच्यावतीने ४२६ घरांच्या विक्रीसाठी जाहिरात काढण्यात आली आहे. या जाहिरातीनुसार ऑनलाईन अर्ज नोंदणी सुरु झाली आहे. ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत प्राप्त झालेल्या ऑनलाईन अर्जांच्या नोंदीनुसार, आतापर्यंत १७५३८ अर्जदारांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे. मात्र, ही नोंदणी केल्यानंतर त्यासोबत नोंदणी शुल्क भरल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाते. त्यासाठी ११८० रुपये नोंदणी शुल्क आहे. त्यामुळे नोंदणी केलेल्या अर्जदारांपैंकी केवळ ७७२ अर्जदारांनीच नोंदणी शुल्क भरले आहे. तर घरांच्या किंमतीनुसार अर्जासोबत अनामत ११ हजार रुपये अनामत रक्कम भरणे आवश्यक असते. अशाप्रकारे केवळ २२९ अर्जदारांनीच अर्जासोबत अनामत भरलेली आहे. कांजूरमार्ग, विक्रोळी,भायखळा तसेच भांडुप आदी भागांमध्ये या सदनिका असून या सदनिकांची रक्कम कमीत कमी ५४ लाख ते जास्तीत जास्त १ कोटी १० लाखांपर्यंत आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >