Thursday, October 30, 2025
Happy Diwali

संजय मिश्रांनी ६२ व्या वर्षी महिमा चौधरीशी केला विवाह ?

संजय मिश्रांनी ६२ व्या वर्षी महिमा चौधरीशी केला विवाह ?

मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री महिमा चौधरी ही पुन्हा एकदा सिनेविश्वात सक्रिय झाली आहे. सध्या सोशल मीडियावर महिमा चौधरीचा एका व्हिडीओ जोरात व्हायरल होत असून यामध्ये ती ६२ वर्षाच्या संजय मिश्रांसोबत दिसत आहे. या व्हिडीओमध्ये संजय मिश्रा आणि महिमा चौधरी हे दोघंपण नवविवाहीत दांपत्यासारखे दिसत आहेत. त्यामुळे मध्यम वयाच्या महिमाने साठी पार केलेल्या संजय मिश्रांसोबत लग्न केले असल्याची चर्चा माध्यमांवर होताना दिसत होती. मात्र आता या व्हिडीओमागील सत्य समोर आले आहे.

अभिनेत्री महिमा चौधरी आणि संजय मिश्रा लग्नाच्या पोशाखात असलेला हा व्हिडीओ त्यांच्या आगामी चित्रपटाचा पहिला लूक होता. 'दुर्लभ प्रसाद की दुसरी शादी' या सिद्धांत राज सिंह दिग्दर्शित चित्रपटाच्या प्रमोशनसाठी त्यांनी हा लूक केला होता. पण व्हिडीओमुळे सुरुवातीला प्रेक्षकांच्या मनात वेगळ्याच चर्चेने जागा घेतली होती.

महिमा चौधरीचे लग्न २००६ मध्ये बॉबी मुखर्जीशी झाले होते. त्यानंतर २००७ मध्ये त्यांना मुलगी झाली. मुलीच्या जन्मानंतर सहा वर्षांनी २०१३ मध्ये ते वेगळे झाले. तर संजय मिश्रा यांचे दोनदा लग्न झाले आहे. पहिल्यांदा त्यांनी रोशनी अचरेजाशी लग्न केले होते. मात्र काही दिवसांनी रोशनी सोबत विभक्त होऊन किरण मिश्रासोबत त्यांनी दुसरे लग्न केले. दरम्यान, व्हायरल झालेल्या व्हिडीओमुळे मिश्रा यांनी महिमा चौधरीसोबत लग्न केले असल्याची चर्चा रंगली होती.

महिमा चौधरी 'परदेस', 'धड़कन' आणि 'इमरजन्सी' यांसारख्या चित्रपटांमधील तिच्या भूमिकांसाठी ओळखली जाते. नुकतीच ती नेटफ्लिक्सवरील 'नादानीयां' या चित्रपटात दिसली होती. संजय मिश्रा हे लोकप्रिय अभिनेते असून 'मसान' सिनेमातली त्यांची भूमिका गाजली. त्यांनी नुकतेच उमेश शुक्ला दिग्दर्शित 'हीर एक्सप्रेस' या चित्रपटात काम केले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा