Tuesday, October 28, 2025
Happy Diwali

गजा मारणे टोळीला धक्का, रुपेश मारणेला अटक

गजा मारणे टोळीला धक्का, रुपेश मारणेला अटक

पुणे : गुंड गजानन उर्फ गज्या मारणेच्या टोळीतील रुपेश मारणेला पोलिसांनी अटक केली आहे. मारणे टोळीचा म्होरक्या गजानन मारणे याच्या पाठोपाठ पोलिसांनी रुपेश मारणेलाही अटक केली आहे. दोन प्रमुख गुंड गजाआड झाल्यामुळे मारणे टोळीच्या कारवाया थंडावण्याची शक्यता वाढली आहे.

पुणे पोलिसांनी काही दिवसांपूर्वी आंदेकर टोळी आणि घायवळ टोळी विरोधात कारवाई केली. आता मारणे टोळी विरोधातही पुणे पोलीस अॅक्शन मोडमध्ये दिसत आहेत. शिवजयंतीच्या दिवशी अभियंता देवेंद्र जोग यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणात दीर्घकाळ फरार असलेला रुपेश मारणेला मुळशी येथून २७ ऑक्टोबर रोजी कोथरुड पोलिसांनी ताब्यात घेतले.

फेब्रुवारी महिन्यात कोथरुड परिसरात झालेल्या घटनेत देवेंद्र जोग या संगणक अभियंत्यावर काही गुंडांनी हल्ला केला होता. जोग हे भाजपचे कार्यकर्ते असल्याने या प्रकरणाला राजकीय वळण मिळाले होते. तसेच केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी या घटनेचा तीव्र निषेध नोंदवत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली होती. या प्रकरणातील इतर मारेकरी आधीच पोलिसांच्या ताब्यात आहेत. मात्र, प्रमुख आरोपी रुपेश या घटनेनंतर पसार झाला होता. अखेर मुळशीमध्ये सापळा रचून त्याला पकडण्यात पोलिसांना यश मिळाले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >