Monday, October 27, 2025
Happy Diwali

अभिनेत्री संस्कृती बालगुडेचा नवा लूक चर्चेत! साकारणार 'कृष्णा'ची भूमिका?

अभिनेत्री संस्कृती बालगुडेचा नवा लूक चर्चेत! साकारणार 'कृष्णा'ची भूमिका?

फॅशन, अभिनय आणि तिच्या कॉन्सेप्ट फोटोशूट ने कायम चर्चेत असलेली मराठी इंडस्ट्री मधली अभिनेत्री म्हणजे संस्कृती बालगुडे ! जिने सिने विश्वात दमदार भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात घर केले असून सध्या ती एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत असलेली बघायला मिळतेय.

संस्कृती अभिनयाच्या सोबतीने उत्तम भरतनाट्यम नृत्यांगना आहे हे सगळ्यांना माहीत असून सोशल मीडिया वर कायम सक्रिय राहून ती अनेक व्हिडिओ फोटो शेयर करताना दिसते.  नुकताच तिने सोशल मीडिया वर एक खास व्हिडिओ शेयर केला असून ज्यात ती " श्री कृष्णाच्या " रुपात दिसतेय.

भगवान श्री कृष्णाच्या रुपात असलेली संस्कृती आणि तिच्या या नव्या लूकच्या चर्चा सोशल मीडिया वर होताना दिसतात. हा खास लूक तिने कुठल्या गाण्यासाठी केला का ? किंवा चित्रपटासाठी केला असावा हे अद्याप गुलदस्त्यात आहे. तिचे हे रूप बघून इंडस्ट्री मधल्या अनेक कलाकार मंडळींने तिचे कौतुक केले आहे. अनेकांनी काय नवीन प्रोजेक्ट असे देखील विचारले आहे. संस्कृतीचा हा नवा लूक खूप कमाल असून ती नक्की काय नवीन करणार याची उत्सुकता सगळ्यांना आहे.

वैविध्यपूर्ण भूमिका साकारणारी संस्कृती या कृष्ण रुपात प्रेक्षकांची मन जिंकताना दिसतेय. तिच्या या रूपाच कोड लवकरच उलगडणार का ? हे बघण उत्सुकतेच ठरणार आहे.

Comments
Add Comment