नवी दिल्ली : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. हळू हळू तो आणखी तीव्र होत आहे. हा कमी दाबाचा पट्टा हळू हळू पूर्व किनाऱ्याकडे सरकत आहे. त्यामुळे ओडिशा सरकारने ३० जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. तसेच पश्चिम बंगाललाही या वादळाचा धोका आहे. याशिवाय चक्रीवादळ मोंथा पुढे सरकण्याचा शक्यतेमुळे आंध्र प्रदेश सरकारने मदत आणि आवश्यक पुरवठ्यासाठी योजना तयार केल्या आहेत . लष्कराच्या तुकड्या देखील सतर्क करण्यात आल्या आहेत.
भारतीय हवामान विभागाने सांगितले आहे की " चक्रीवादळ मंगळवारी संध्याकाळी किंवा रात्री आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यावर मछलीपट्टणम आणि कलिंगपट्टणम दरम्यान काकीनाडाजवळच्या ११० किलोमीटरपर्यंत प्रचंड हवेची गती असणाऱ्या चक्रीवादळाच्या रूपात असण्याची शक्यता आहे. तसेच हवामान विभागाने २८ आणि २९ नोव्हेंबर रोजी ओडिशामध्ये अती मुसळधार ते अत्यंत मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज वर्तवला आहे.
अलर्ट
हवामान विभागाने दक्षिण ओडिशाला पावसाचा इशारा दिला आहे. ओडिशात काही ठिकाणी २० मिलीमीटर पेक्षाही अधिक पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. सरकारी कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द प्रचंड वादळी पाऊस आणि वाऱ्यामुळे अनेक जिल्हे प्रभावित होणार असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी संभाव्य भागांमधून नागरिकांचे सुरक्षित ठिकणी स्थलांतर करण्याचे आदेश दिले आहेत. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत.






