Saturday, October 25, 2025
Happy Diwali

शिक्षक होण्याची सुवर्णसंधी, CTETची अधिसूचना जाहीर

शिक्षक होण्याची सुवर्णसंधी, CTETची अधिसूचना जाहीर

मुंबई : केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. या वेळापत्रकानुसार केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा ८ फेब्रुवारी २०२६ रोजी होणार आहे. ही परीक्षा देशातील १३२ शहरांमध्ये वीस भाषांमध्ये घेतली जाईल. परीक्षेचे तपशील, अभ्यासक्रम, भाषा, पात्रता निकष, परीक्षा शुल्क, परीक्षा शहरे आणि महत्त्वाच्या तारखा यासंबंधीची सविस्तर माहिती CTET च्या वेबसाईटवर मिळेल.

अर्ज कसा करावा ? 

१.उमेदवारांनी ctet.nic.in या अधिकृत वेबसाईटवर जावे.

२. 'apply for CTET 2026' या लिंकवर क्लिक करावे.

३. सर्व वैयक्तिक आणि शैक्षणिक तपशील भरावेत.

४. परीक्षा केंद्र, पेपर (I किंवा II, किंवा दोन्ही) निवडावे.

५. प्राधान्याची भाषा निवडावी.

६. उमेदवारांनी त्यांचा पासपोर्ट साईझचा फोटो आणि सही आवश्यक फॉरमॅटनुसार अपलोड करावी.

७. अर्ज सादर करावा.

८. अर्जाची प्रिंट काढावी.

अर्ज शुल्क : अर्ज शुल्क हे ऑनलाईन भरावे. ओपन आणि ओबीसी उमेदवारांसाठी एका पेपरचे १००० रुपये आहे. तर , दोन्ही पेपरसाठी १२०० रुपये शुल्क आहे. एससी, एसटी आणि पीडब्ल्यूडी उमेदवारांसाठी एका पेपरसाठी ५०० रुपये आणि दोन्ही पेपरसाठी ६०० रुपये शुल्क आहे.

परीक्षेचे स्वरूप : CTET परीक्षा दोन पेपरमध्ये विभागलेली आहे. पेपर १ हा इयत्ता पहिली ते पाचवी पर्यंत शिकवू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी आहे. पेपर २ हा इयत्ता सहावी ते आठवी पर्यंत शिकवू इच्छिणाऱ्यांसाठी आहे. परीक्षेत १५० बहुपर्यायी प्रश्न अर्थात MCQs असतील. तसेच, निगेटिव्ह मार्किंग पद्धत नसेल.

Comments
Add Comment