
मुंबई : दिवाळी निमित्त दरवर्षी शाहरुख खान आपल्या मन्नत वर दिवाळी पार्टीचं आयोजन करत असतो. या भव्यदिव्य पार्टीला हिंदीसिनेविश्वातील अनेक कलाकार येतात. पण या वर्षी शाहरुखने दिवाळी पार्टीचे आयोजन केलं नाही. मन्नत मध्ये सुरु असलेल्या रेनोवेशनमुळे यावेळी शाहरुख खानने आपल्या कुटुंबासोबत दिवाळी साजरी केली. त्याच्या कामाबाबदल बोलायचं झालं तर सध्या तो मुलगी सुहाना खान सोबत 'किंग' चित्रपटाच्या शुटिंगसह आंतरराष्ट्रीय प्रोजेक्टमध्ये व्यस्त आहे.
शाहरुखने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक भावनिक संदेश लिहून चाहत्यांप्रती प्रेम व्यक्त केले. त्याने गौरी खान दिवाळी पूजा करत असतानाचा एक फोटो शेअर केला. कॅप्शनमध्ये त्याने लिहिले, “सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा! माँ लक्ष्मी तुम्हाला समृद्धी आणि आनंद देवो.
शाहरुख खान सध्या आपल्या नव्या प्रोजेक्टमध्ये व्यस्त आहे. तो सध्या युरोपमध्ये 'किंग' चित्रपटाचे शूटिंग करत आहे. गेल्या आठवड्यात तो जॉय फोरममध्ये दिसला. जिथे त्याने कोरियन चित्रपट लीजेंड ली जंग-जे सह अनेक कलाकारांची भेट घेतली. 'किंग' मध्ये शाहरुख पहिल्यांदाच मुलगी सुहाना खानसोबत काम करणार आहे. या चित्रपटात दीपिका पदुकोण यांची महत्त्वाची भूमिका असेल. तसेच राणी मुखर्जी आणि अभिषेक बच्चन हे कलाकारही दिसणार आहेत. 'मन्नत'चे काम पूर्ण झाल्यावर पुढच्या वर्षी ग्रँड पार्टी होण्याची शक्यता आहे.