Tuesday, October 21, 2025
Happy Diwali

शरद पवारांच्या पक्षाला मोठा धक्का, उपाध्यक्षांचा आकस्मिक मृत्यू

शरद पवारांच्या पक्षाला मोठा धक्का, उपाध्यक्षांचा आकस्मिक मृत्यू

चाळीसगाव : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष राजीव देशमुख (राजू देशमुख) यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. राजीव देशमुख हे चाळीसगाव विधानसभेचे माजी आमदार होते. ते २००९ ते २०१४ या काळात विधानसभेचे सदस्य होते. पण २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता.

राजीव देशमुख हे शरद पवारांच्या विश्वासूंपैकी एक होते. त्यांच्याकडे पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्ष पदाची जबाबदारी होती. पण हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने राजीव देशमुख यांचे ५५ व्या वर्षीच आकस्मिक निधन झाले. अस्वस्थ वाटू लागल्यावर त्यांना धुळे येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. पण उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला.

राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली. अनेकांनी अजित पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतला त्यावेळी राजीव देशमुख यांनी ठामपणे शरद पवारांची साथ देण्याचा निर्णय घेतला. यानंतर राजीव देशमुख यांचे पक्षातील स्थान आणखी बळकट झाले. लवकरच होणार असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत त्यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी सोपवली जाणार होती. पण ही जबाबदारी जाहीर होण्याआधीच राजीव देशमुख यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.

Comments
Add Comment