Sunday, October 19, 2025
Happy Diwali

भाईजानच्या सुरक्षेत वाढ, शूटींग दरम्यान फोन जवळ ठेवणेही बंधनकारक

भाईजानच्या सुरक्षेत वाढ, शूटींग दरम्यान फोन जवळ ठेवणेही बंधनकारक

मुंबई: सलमान खान नेहमीच त्याला येणाऱ्या धमक्यांमुळे चर्चेत असतो. सलमानला सतत येणाऱ्या धमक्यांमुळे त्याच्या आजूबाजूला कडक सुरक्षा असते. सध्या सलमान त्याचा आगामी चित्रपट 'बॅटल ऑफ गलवान' च्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. हे शूटींग एवढ्या कडक बंदोबस्तमध्ये सुरू आहे की, सलमानच्या आजूबाजूला पक्षी फिरणे सुद्धा कठीण असल्याचे सूत्रांकडून कळते. बिग बॉसच्या सेवटवर जेव्हा सलमान येतो त्यावेळीही मोठा बंदोबस्त असतो.

वर्षानुवर्षे सलमान खानची सुरक्षा त्याचा अंगरक्षक शेरा सांभाळत आहे. जो सावलीसारखा त्याच्यासोबत राहतो. आंतरराष्ट्रीय दौऱ्यांवर असो किंवा भारतातील शूटिंग दरम्यान, शेरा नेहमीच सलमान खानसोबत असतो. पण मिळालेल्या माहितीनुसार समजते की, शेरा व्यतिरिक्त १५ प्रशिक्षित कमांडो सलमानच्या सुरक्षेचा भाग आहेत. याशिवाय, सलमानला सरकारनेही सुरक्षा पुरवली आहे. त्याला भारतातील इतर कोणत्याही अभिनेत्यापेक्षा जास्त सुरक्षा पुरवण्यात आली आहे.

सलमान खान सध्या मुंबईत 'बॅटल ऑफ गलवान' चे शूटिंग करत आहे. शूटींग दरम्यान चित्रपटाच्या सर्व कलाकारांना आणि क्रूला त्यांचे मोबाईल फोन शूटिंगच्या ठिकाणापासून दूर ठेवणे बंधनकारक केले आहे. यामध्ये सलमान खान, तसेच दिग्दर्शक अपूर्व लाखिया यांचा समावेश आहे. कारण शूटिंगच्या ठिकाणावरील कोणत्याही फोनवरून सलमानला ट्रॅक करता येऊ शकते. त्यामुळे सुरक्षेचा पर्याय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. शूटिंगनंतर कोणत्याही सदस्याच्या फोनवर काही संशयास्पद आढळल्यास त्याची चौकशी केली जाते. शिवाय, जर कोणी सेटवर सलमानला भेटायला आला तर त्यांना प्रथम त्यांचे आधार कार्ड स्कॅन करून परवानगी घेणे सक्तीचे केले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >