Saturday, October 18, 2025
Happy Diwali

Brahmaputra Apartment Fire : खासदारांच्या 'ब्रह्मपुत्रा अपार्टमेंट'च्या पार्किंगला भीषण आग, अग्निशमन दलाच्या १२ गाड्या घटनास्थळी

Brahmaputra Apartment Fire : खासदारांच्या 'ब्रह्मपुत्रा अपार्टमेंट'च्या पार्किंगला भीषण आग, अग्निशमन दलाच्या १२ गाड्या घटनास्थळी

नवी दिल्ली : नवी दिल्लीतील विश्वंभरदास मार्गावर असलेल्या ब्रह्मपुत्रा अपार्टमेंटमध्ये (Brahmaputra Apartment) आज सकाळी भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. संसदेपासून (Parliament) अगदी काही मिनिटांच्या अंतरावर असलेल्या या इमारतीत अनेक खासदारांची (MPs) निवासस्थाने आहेत, ज्यात राज्यसभेतील खासदारांच्या घरांचा समावेश आहे. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या (Fire Brigade) १२ गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या.

ही आग प्रामुख्याने ब्रह्मपुत्रा अपार्टमेंटच्या पार्किंग परिसरात लागल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. आगीचे स्वरूप लक्षात घेता, यावर नियंत्रण मिळवण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. ही आग कशामुळे लागली, याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. तातडीने रुग्णवाहिका (Ambulance) घटनास्थळी पोहोचली आहे. या आगीत जिवीतहानी झाली आहे की नाही, याची माहिती अद्याप मिळालेली नाही. सध्या दिवाळीचा सण असल्याने अनेक खासदार इथे उपस्थित नाहीत. मात्र, त्यांचे कर्मचारी आणि खासगी सहायक (P.M.) इथे असताना ही आग लागल्याने प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे.

(बातमी अपडेट होत आहे)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >