Thursday, October 16, 2025

दिवाळी पहाटनिमित्त २० ऑक्टोबरला ठाण्यात वाहतुकीत बदल

दिवाळी पहाटनिमित्त २० ऑक्टोबरला ठाण्यात वाहतुकीत बदल

वाहतुकीचे नियोजन

१. डॉ. मूस चौक येथून गडकरी चौकाच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या वाहनांना डॉ. मूस चौकाजवळ प्रवेशबंदी असेल. येथील वाहने टॉवरनाका, टेंभीनाका मार्गे वाहतूक करतील. २.  गडकरी चौक येथून डॉ. मूस चौकाच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या वाहनांना गडकरी चौकाजवळ प्रवेशबंदी असेल. येथील अल्मेडा चौक, गजानन महाराज चौक, तीन पेट्रोल पंप, हरिनिवास मार्गे वाहतूक करतील. ३.  घंटाळी मंदिर चौक येथून पु. ना. गाडगीळ चौकाच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या वाहनांना घंटाळी मंदिर जवळ प्रवेश बंदी असेल. येथील वाहने घंटाळी मंदिर येथून घंटाळी पथ मार्गे वाहतूक करतील. ४.  गजानन महाराज चौक ते तीन पेट्रोल पंप या मार्गावरील काका सोहनी पथ येथून पु. ना. गाडगीळ चौकाच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या वाहनांना गजानन महाराज चौकाजवळ प्रवेशबंदी असेल. येथील वाहने तीन पेट्रोल पंप, हरिनिवास              चौक मार्गे किंवा घंटाळी मंदिर मार्गे वाहतूक करतील. ५.  राजमाता वडापाव सेंटर दुकान येथून गजानन महाराज चौकाच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या वाहनांना राजमाता वडापाव सेंटर दुकानाजवळ प्रवेशंबदी असून येथील वाहने सेंटरजवळून गोखले रोड मार्गे वाहतूक करू शकतील.

ठाणे  :ठाण्यात दिवाळी पहाटनिमित्त येणाऱ्या गर्दीमुळे वाहतुकीचा खोळंबा होऊ शकतो. त्या दृष्टीने २० ऑक्टोबरला वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून ठाणे पोलिसांनी वाहतूक बदल लागू केले आहेत. २० ऑक्टोबरला सकाळी ६ ते दुपारी २ वाजेपर्यंत हे वाहतूक बदल लागू असतील. ठाण्यात दरवर्षी राम मारुती रोड, मासुंदा तलाव परिसर, नौपाडा भागात दिवाळी पहाटचे विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्यानिमित्ताने ठाणे, डोंबिवली, कल्याण, मुलुंड भागातून हजारो तरुण- तरुणी गर्दी करत असतात. शिवसेना, भाजप आणि विविध संस्थेच्या माध्यमातून हे कार्यक्रम आयोजित केले जातात. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह कलाकार देखील येथे उपस्थित असतात.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >