Wednesday, October 15, 2025

डोंबिवली स्थानकात पुलाच्या गर्डर लाँचिंगसाठी विशेष ब्लॉक

डोंबिवली स्थानकात पुलाच्या गर्डर लाँचिंगसाठी विशेष ब्लॉक

मुंबई (प्रतिनिधी) : मध्य रेल्वेवरील डोंबिवली स्थानकात १२ मीटर रुंद पादचारी पूलाच्या (एफओबी) गर्डर लॉचिंगसाठी अप आणि डाउन जलद मार्ग तसेच ५ वा आणि ६ वा मार्गावर विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक १५ व १६ ऑक्टोबर च्या रात्री ००.२० ते ३.२० वाजेपर्यंत ३ तास तर डाउन आणि अप जलद मार्गावर : १.२० ते ३.२० वाजेपर्यंत तास घेतला जाईल असे म.रे. कडून सांगण्यात आले आहे.

मेल/एक्सप्रेस आणि विशेष गाड्या, ब्लॉक कालावधीत कार्यप्रणालीनुसार डायव्हर्ट किंवा नियमन केल्या जाऊ शकतात. दिवा (सर्व क्रॉसओव्हर्स वगळता) ते कल्याण (सर्व क्रॉसओव्हर्स वगळता) गाड्यांचे नियमन आणि डायव्हर्जन्सः डाउन मेल/एक्सप्रेस गाड्याः गाडी क्रमांक ११०४१, २२८६५, आणि २२५३८ दिवा ते कल्याण दरम्यान डाउन जलद मार्गावर चालवण्यात येतील.

अप मेल/एक्सप्रेस गाड्या : गाडी क्रर्माक ११०२० आणि १८५१९ कल्याण-पनवेल मार्गे डायव्हर्ट केल्या जातील आणि कल्याण प्रवाशांना उत्तरण्यासाठी पनवेल आणि ठाणे येथे थांबे दिली जातील. अप मेल/एक्सप्रेस गाड्यांचे नियमन गाडी क्रमांक २२१०४ कल्याण येथे २५ मिनिटे नियमन केली जाईल.

गाडी क्रमांक १२१०४ कल्याण येथे २० मिनिटे नियमन केली जाईल.

गाडी क्रमांक १८०३० खडवली येथे १० मिनिटे नियमन केली जाईल.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा