Tuesday, October 14, 2025

बांगलादेशातील कापड कारखान्यात भीषण आग, ९ जणांचा मृत्यू

बांगलादेशातील कापड कारखान्यात भीषण आग, ९ जणांचा मृत्यू

ढाका : बांगलादेशमधील एक कपडा कारखाना आणि केमिकल गोदामात भीषण आग लागली. ही घटना मीरपूरच्या रूपनगर भागातील आहे. या दुर्घटनेत जणांचा मृत्यू झाला आहे. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, केमिकल गोदाम रेडीमेड गारमेंट कारखान्यालाच लागून होतं. हा कारखाना मजली आहे आणि आग चौथ्या मजल्यावर लागली होती.

अग्निशमन सेवा आणि नागरिक सुरक्षा विभागाच्या मीडिया शाखेचे अधिकारी तल्हा बिन जसीम यांनी सांगितले की, त्यांना स्थानिक वेळेनुसार सकाळी 11:40 वाजता आगीची माहिती मिळाली आणि अग्निशमनची पहिली टीम सकाळी 11:56 वाजता घटनास्थळी पोहोचली.

जसीम यांनी सांगितले की, केमिकल गोदामात ब्लीचिंग पावडर, प्लास्टिक साहित्य आणि हायड्रोजन पेरॉक्साइड साठवलेले होते. त्यांनी सांगितले की, या घटनेत 9 जणांचा मृत्यू झाला आहे. आग इतकी भयानक होती की अद्यापही ती पूर्णतः विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अधिकाऱ्यांकडून आगीचे नेमके कारण शोधण्याचे आणि झालेल्या नुकसानाचे मूल्यमापन करण्याचे काम सुरू आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, कपडा कारखान्याच्या पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावरून 9 मृतदेह सापडले आहेत. अधिकाऱ्यांनी संशय व्यक्त केला आहे की, सर्व मृत्यू विषारी वायूमुळे झाले असावेत. अद्यापही कारखान्याच्या आत शोधमोहीम चालू आहे.

Comments
Add Comment