
धुळे :जगभरात थैमान घालणाऱ्या मंकी पॉक्सचा राज्यातील पहिला रुग्ण धुळ्यात आढळून आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. रुग्णाचे दोन्ही रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने हिरे रुग्णालय प्रशासनही सतर्क झाले आहे.
मंकी पॉक्स हा संसर्गजन्य आजार असल्याने रुग्णाला स्वतंत्र विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले असून त्याच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्यासाठी महापालिकेला कळविण्यात आले आहे. मंकी पॉक्स बाधित रुग्ण २ ऑक्टोबर रोजी सौदी अरेबियाहून धुळ्यातील गरीब नवाज नगर येथे आला होता. गेल्या चार वर्षांपासून तो सौदी अरेबियात वास्तव्यास आहे.