
मुंबई : देशभरात सुमारे १ लाख ३५ हजार कोटी रुपयांच्या दावा न केलेल्या ठेवी विविध बँकांमध्य शिल्लक आहेत. महाराष्ट्र राज्यात ५,८६६ कोटी रुपये बेवारस स्थितीत पडून आहेत, ज्यात वैयक्तिक खात्यांच्या ४,६१२ कोटी, संस्थांच्या १,०८२ कोटी आणि सरकारी योजनांतील १७२ कोटी रुपयांच्या ठेवी समाविष्ट आहेत.
आरबीआयच्या नियमानुसार, १० वर्षांपासून निष्क्रिय असलेल्या खात्यांतील ठेवो, ठेवीदार शिक्षण व जागरूकता निधीमध्ये हस्तांतरित केल्या जातात. तथापि, खातेदारांना आपले पैसे परत मिळविण्याचा पूर्ण हक्क आहे.