
तवांग : चीन सीमेजवळच्या भारतीय गावांचा झपाट्याने विकास सुरू आहे. तवांग जिल्ह्यातील सीमेजवळच्या १५० गावांमध्ये केंद्र सरकारच्या व्हायब्रंट व्हिलेज योजनेंतर्गत पर्यटनाला चालना देण्यासाठी झपाट्याने विकास सुरू आहे. सर्व गावांमध्ये पक्के काँक्रीटचे रस्ते तयार करण्यात आले आहेत. गावात वीज पुरवठा २४ तास राहील अशी व्यवस्था करण्यात आली आहे. सर्व गावांमध्ये डिजिटल सोयीसुविधा उपलब्ध आहेत.
तवांग जिल्ह्यात १४७ कोटी रुपये खर्चून एक कन्व्हेशन सेंटर अर्थात सांस्कृतिक केंद्र उभारण्यात आले आहे. या सेंटरचे उद्घाटन पंतप्रधान मोदींनी काही दिवसांपूर्वीच केले आहे. याआधी मोदींनी मागच्या वर्षीच सर्वाधिक उंचीवरील बोगद्याचे आणि रस्त्याचे उद्घाटन केले.
अरुणाचल प्रदेशमधील तवांग जिल्ह्यात फुटबॉल खेळण्यासाठी येणाऱ्यांची संख्या वाढली आहे. आयोजक विविध फुटबॉल स्पर्धांचे आयोजन करत आहे. या निमित्ताने तवांगमध्ये बाहेरुन येणाऱ्या पाहुण्यांची आणि पाहुण्या खेळाडूंची संख्या वाढत आहे. फुटबॉलच्या निमित्ताने तवांगमध्ये लहान मोठ्या व्यवसायांना चालना मिळू लागली आहे.