
मुंबई: अभिनेत्री आणि दिग्दर्शक मृण्मयी देशपांडेचा मनाचे श्लोक हा मराठी चित्रपट १० ऑक्टोबर रोजी राज्यभर प्रदर्शित करण्यात आला. मात्र चित्रपटाच्या नावावरुन प्रदर्शनापूर्वीपासूनच वाद सुरु आहे. त्यामुळे दिग्दर्शक मृण्मयी देशपांडेने चित्रपटाचे नाव बदलून पुन्हा प्रदर्शित करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. याबद्दल तिने सोशल मीडियावर पोस्ट करुन कळवले आहे.
मृण्मयी देशपांडेने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत,"नमस्कार! 'मना'चे श्लोक या आमच्या चित्रपटाच्या प्रदर्शनावरून काल आणि आज पुणे, संभाजीनगर आणि पश्चिम महाराष्ट्रात ज्या घटना घडल्या त्या अतिशय दुःखद आहेत. हा संपूर्ण घटनाक्रम पाहता आम्ही या चित्रपटाचं प्रदर्शन संपूर्ण महाराष्ट्रात थांबवत आहोत आणि सिनेमाच्या नवीन नावासह येत्या गुरुवारी दिनांक १६ ऑक्टोबर २०२५ रोजी पुन्हा एकदा हा चित्रपट प्रदर्शित करत आहोत.भेटूयात!' असे स्पष्ट केले आहे.

मुंबई: जागतिक कन्या दिनानिमित्त 'आशा' या चित्रपटचे विशेष स्क्रिनिंग आयनॉक्स, नरिमन पॉईंट येथे पार पडले. या विशेष स्क्रिनिंगला खा. डॉ. श्रीकांत शिंदे ...
समर्थ रामदास स्वामी लिखित मनाचे श्लोक हे धार्मिक ग्रंथाचे नाव चित्रपटासाठी वापरण्यात आल्यामुळे हिंदूवादी संघटनांनी नाराजी व्यक्त केली. तसेच हा चित्रपट पुण्यातील धायरी भागातील अभिरूची मॉलमधील थिएटरमध्ये आणि कोथरूडमधील एका थिएटरमध्ये बंद पाडण्यात आल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे चित्रपटाचे मोठे नुकसान झाल्याने नाव बदलून पुन्हा प्रदर्शित करण्याचा निर्णय मृण्मयी देशपांडेने घेतला आहे.
या प्रकरणात मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी मृण्मयीला पाठींबा दिला आहे. तिच्या नाजूक परिस्थितीमध्ये अनेक कलाकार तिच्यासोबत उभे राहिले आहेत. ज्यात सिद्धार्थ चांदेकर, अमृता खानविलकर, सखी गोखले आणि इतर अनेक जणांचा समावेश आहे.