Saturday, October 11, 2025

'बिग बी' यांनी ८३ व्या वाढदिवसाला स्वतःला दिली खास भेट !

'बिग बी' यांनी ८३ व्या वाढदिवसाला स्वतःला दिली खास भेट !

मुंबई : बॉलीवूडचे शहंशाह अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ८३व्या वाढदिवसाच्या दिवशी स्वतःला एक खास भेट दिली आहे. अभिनयाच्या जगात अपार यश मिळवलेल्या बिग बींनी आता मुंबईजवळील अलिबागमध्ये रिअल इस्टेटमध्ये आणखी मोठी गुंतवणूक करत आपल्या संपत्तीमध्ये भर घातली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बच्चन यांनी एकूण क्षेत्रफळ ९,५५७ चौरस फूट मालमत्ता खरेदी केली आहे. या व्यवहारासाठी ७ ऑक्टोबर रोजी नोंदणी करण्यात आली असून त्यांनी ₹३९.५८ लाखांची स्टॅम्प ड्युटी भरली आहे. या मालमत्तेची एकत्रित किंमत ₹६.५८ कोटी इतकी आहे. सर्व मालमत्ता HOABL लँडबिल्ड प्रायव्हेट लिमिटेड कडून खरेदी करण्यात आले आहेत.

अलिबागमधील बच्चन यांची दुसरी मालमत्ता आहे. याआधी एप्रिल २०२४ मध्ये त्यांनी १० कोटी रुपयांत १०,००० चौरस फूटचा एक प्लॉट घेतला होता. अलिबागमधील शांततेच्या शोधात अनेक सेलिब्रिटी इथे मालमत्ता खरेदी करत आहेत.

अलिबाग व्यतिरिक्त, अमिताभ बच्चन यांची अयोध्येत देखील रिअल इस्टेट गुंतवणूक आहे. रामजन्मभूमी मंदिराच्या उद्घाटनाच्या आधी त्यांनी ५,३७२ चौरस फूटची मालमत्ता खरेदी केली होती. तसेच त्यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ ट्रस्ट अंतर्गत ५४,००० चौरस फूटचा एक भूखंडही त्यांच्या नावावर आहे.

अलिबागमध्ये मालमत्ता खरेदी करणाऱ्या सेलिब्रिटींच्या यादीत कार्तिक आर्यन, कृती सॅनन, शाहरुख खान, विराट कोहली-अनुष्का शर्मा, दीपिका पदुकोण-रणवीर सिंग, सुहाना खान, राहुल खन्ना आणि अनिता श्रॉफ अडाजानिया यांचा समावेश आहे. अलिबाग आता केवळ पर्यटन स्थळ न राहता सेलिब्रिटींची आवडती गुंतवणूक ठिकाणे बनली आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा