Wednesday, October 8, 2025

डिजिटल व्यवहारातील धोका कमी होणार, आरबीआयच्या नियमावलीत मोठे बदल !

डिजिटल व्यवहारातील धोका कमी होणार, आरबीआयच्या नियमावलीत मोठे बदल !

मुंबई : आरबीआयने आजपासून ऑनलाईन पेमेंटसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. या नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार फोन पे, पेटीएम आणि जीपे सारख्या यूपीआय अ‍ॅपसाठी बायोमेट्रिक प्रमाणीकरण करण्यात येणार आहे. या नवीन बदलाबद्दल ग्लोबल फिनटेक फेस्टिवलमध्येही चर्चा करण्यात येत आहे.

यूपीआयच्या या नवीन सुविधेमध्ये व्यवहाराचे प्रमाणीकरण भारत सरकारच्या आधार कार्ड प्रणालीमध्ये नोंदवलेल्या बायोमेट्रिक डेटाद्वारे केले जाणार आहे. ज्यात वापरकर्त्याचा चेहरा किंवा फिंगरप्रिंट त्यांच्या आधार कार्डवरील माहितीसोबत जुळवून पाहिला जाईल आणि त्यानंतर व्यवहाराला परवानगी मिळणार आहे. आरबीआयने केलेल्या या नवीन बदलामुळे व्यवहार सुरक्षित आणि अधिक सोपा होणार आहे.

आजपर्यंत यूपीआय अ‍ॅपचा वापर करताना केवळ पिनकोडचा वापर करण्यात येत होता. त्यामुळे अनेकदा वापरकर्त्यांचे पिनकोड हॅक होवून बॅंक खात्यातील रक्कम चोरली गेली आहे. अशा घटनांना आळा घालण्यासाठी आरबीआयने आजपासून फिंगर प्रिंट आणि चेहऱ्याच्या आधाराने बायोमेट्रिक करण्याचा पर्याय उपलब्ध केला आहे. ज्यामुळे वापरकर्त्याच्या फिंगर प्रिंट किंवा चेहऱ्याचे प्रमाणीकरण केल्याशिवाय व्यवहार केला जाऊ शकत नाही. हा एक सुरक्षित व्यवहाराचा उत्तम पर्याय तयार करण्यात आला आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा