
डोंबिवली : अंबरनाथ तालुक्यातील जांभुळ जलशुद्धीकरण केंद्र आणि बारवी गुरूत्व वाहिनी देखभाल दुरुस्तीची कामे गुरुवार ९ ऑक्टोबर रात्री १२ ते शुक्रवार १० ऑक्टोबर रोजी रात्री १२ वाजता या कालावधीत करण्यात येणार आहेत.
त्यामुळे उल्हासनगर, डोंबिवली, कल्याण डोंबिवली पालिका क्षेत्र, उल्हासनगर पालिका आणि परिसरातील औद्योगिक, निवासी आणि ग्रामीण भागाला होणारा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.