Tuesday, October 7, 2025

भारताचा ‘ध्वनी’ ब्रह्मोसपेक्षाही महाभयंकर?

भारताचा ‘ध्वनी’ ब्रह्मोसपेक्षाही महाभयंकर?

नवी दिल्ली : भारताने ब्रह्मोसपेक्षाही ‘महाभयंकर’ क्षेपणास्त्र तयार केले आहे, ज्यामुळे पाकिस्तानचे नवे तळही थेट टप्प्यात येणार आहेत. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था आता ‘ध्वनी’ नावाच्या नवीन पिढीच्या क्षेपणास्त्राची चाचणी घेण्याची तयारी करत आहे.

हे क्षेपणास्त्र ब्रह्मोस क्षेपणास्त्रापेक्षाही अधिक वेगवान आणि दूर पल्ल्याचे आहे. २०२५ च्या अखेरीस या क्षेपणास्त्राची पहिली चाचणी होण्याची शक्यता आहे. ‘ध्वनी’ क्षेपणास्त्रात सुमारे ७,४०० किलोमीटर प्रति तास या वेगाने उड्डाण करण्याची क्षमता असेल.

आवाजाच्या गतीपेक्षा सहा पटींहून अधिक असलेल्या या क्षेपणास्त्रामुळे शत्रूला बचाव करण्यासाठी वेळच मिळणार नाही.

Comments
Add Comment