
नवी दिल्ली : निवडणूक आयोगाची आज (सोमवार ६ ऑक्टोबर २०२५) संध्याकाळी चार वाजता दिल्लीत विज्ञान भवन येथे पत्रकार परिषद आहे. या पत्रकार परिषदेत बिहार विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोग बिहार विधानसभा निवडणुकीचा सविस्तर कार्यक्रम जाहीर करण्याची शक्यता आहे. सुरक्षेच्या कारणांमुळे बिहारची निवडणूक एक पेक्षा जास्त टप्प्यांमध्ये होण्याची शक्यता आहे. पण अंतिम माहिती पत्रकार परिषदेतूनच मिळेल.
बिहारमध्ये २०२० मध्ये तीन टप्प्यात निवडणूक झाली होती. त्यावेळी कोरोना आजारामुळे तीन टप्प्यांचे नियोजन केल्याचे निवडणूक आयोगाने जाहीर केले होते. यावेळी किमान दोन टप्प्यात बिहार विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता आहे.
बिहारमध्ये छट पर्वानंतर पहिल्या टप्प्याचे मतदान होईल अशी शक्यता आहे. निवडणूक आयोग १५ नोव्हेंबरपूर्वी मतमोजणी करून बिहारमधील निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचे नियोजन करत असल्याचे समजते.
बिहार विधानसभा निवडणूक निकाल
एनडीए अर्थात रालोआ - १२५ जागांवर विजय
महागठबंधन - ११० जागांवर विजय
इतर - आठ जागांवर विजय
निकालाअंती बिहारमध्ये एनडीएने सत्ता स्थापन केली आणि नितीश कुमार मुख्यमंत्री झाले.