
मुंबई (प्रतिनिधी): भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने १ ऑक्टोबर २०२५ पासून आधार नोंदणी आणि अद्ययावतीकरण सेवांच्या शुल्कात मोठी वाढ केली आहे. या नवीन दरवाढीमुळे शुल्कात तब्बल ५० टक्क्यांपर्यंत वाढ झाली असून, सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री लागली आहे. या निर्णयामुळे विद्यार्थी, शेतकरी आणि सामान्य नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे. ही सुधारित शुल्क यादी ३० सप्टेंबर २०२८ पर्यंत लागू राहणार आहे.
भारतातील प्रत्येक रहिवाशासाठी आधार कार्ड सक्तीचे आहे. नवजात बालकापासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांना आधार नोंदणी करणे आणि त्याचे तपशील अद्ययावत ठेवणे आवश्यक आहे. मात्र, UIDAI ने लागू केलेल्या नवीन शुल्कामुळे आधारशी संबंधित सेवांचा आर्थिक बोजा वाढला आहे. नवीन आधार नोंदणी आणि ५ ते १७ वयोगटातील विद्यार्थ्यांचे बायोमेट्रिक अद्ययावतीकरण यांना शुल्कातून सवलत देण्यात आली आहे. परंतु इतर सेवांच्या शुल्कात लक्षणीय वाढ झाली आहे.
बायोमेट्रिक अद्ययावतीकरण: यापूर्वी १०० रुपये असलेले शुल्क आता १२५ रुपये करण्यात आले आहे (२५% वाढ). डेमोग्राफिक अद्ययावतीकरण: आधार केंद्र किंवा ऑनलाइन पोर्टलवरील शुल्क ५० रुपये वरून ७५ रुपये (५०% वाढ). पत्याचा पुरावा/ओळखीचा पुरावा/दस्तऐवज अद्ययावतीकरण: यापूर्वी ५० रुपये असलेले शुल्क आता ७५ रुपये (५०% वाढ). ई-केवायसी, आधार शोध, रंगीत प्रिंट: शुल्क ३० रुपये वरून ४० रुपये (३३% वाढ). या वाढीव शुल्कामुळे सर्वसामान्य नागरिकांवर अतिरिक्त आर्थिक भार पडला आहे. विशेषतः वारंवार अद्ययावतीकरण करावे लागणाऱ्या नागरिकांना हा बदल जास्त जाचक ठरत आहे.
मंत्रालयाने म्हटले आहे की, मोफत बायोमेट्रिक अपडेटमुळे मुलांना शिक्षण, शिष्यवृत्ती आणि थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) योजनेचा लाभ घेणे सोपे होईल. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण अर्थात UIDAI ने ७-१७ वर्ष वयोगटातील मुलांसाठी आधार बायोमेट्रिक अपडेटचे शुल्क माफ केले आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, ही सवलत १ ऑक्टोबर २०२५ पासून लागू झाली असून, ती एक वर्षासाठी उपलब्ध असेल. यामुळे सुमारे ६ कोटी मुलांना फायदा होईल. मंत्रालयाने म्हटले आहे की, मोफत बायोमेट्रिक अपडेटमुळे मुलांना शिक्षण, शिष्यवृत्ती आणि थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) योजनेचा लाभ घेणे सोपे होईल.
पाच वर्षांखालील मुलांची आधार नोंदणी त्यांचे छायाचित्र, नाव, जन्मतारीख, लिंग, पत्ता आणि जन्म प्रमाणपत्राद्वारे होते. या वयात बोटांचे ठसे आणि डोळ्यांच्या बुबुळांचे बायोमेट्रिक्स घेतले जात नाहीत, कारण ते पूर्णपणे विकसित झालेले नसतात.
यामुळे, विद्यमान नियमांनुसार, मुलाचे वय ५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर, आधारमध्ये बोटांचे ठसे, डोळ्यांच्या बुबुळांचे स्कॅन आणि छायाचित्र अपडेट अनिवार्य आहे. याला पहिले अनिवार्य बायोमेट्रिक अपडेट (MBU-१) म्हटले जाते. १५ वर्षे वय पूर्ण झाल्यानंतर, पुन्हा बायोमेट्रिक्स अपडेट करणे आवश्यक असून १५ वर्षे वय पूर्ण झाल्यानंतर, पुन्हा बायोमेट्रिक्स अपडेट करणे आवश्यक आहे, ज्याला दुसरा MBU म्हणतात. ५-७ आणि १५-१७ वर्षे वयोगटात केलेले हे अपडेट आता मोफत असतील.
यापूर्वी, या वयोगटाबाहेर प्रत्येक MBU साठी १२५ रुपये शुल्क आकारले जात होते. नव्या निर्णयामुळे ५ ते १७ वर्षे वयोगटातील सर्व मुलांसाठी बायोमेट्रिक अपडेट पूर्णपणे मोफत झाले आहे.