Sunday, October 5, 2025

कधी सुरू होणार महाराष्ट्राच्या विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ?

कधी सुरू होणार महाराष्ट्राच्या विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ?

मुंबई : महाराष्ट्राच्या विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सोमवार ८ डिसेंबर २०२५ पासून सुरू होणार आहे. विधिमंडळ सचिवालयाने ही माहिती दिली आहे. अधिवेशनाचे तात्पुरते वेळापत्रक सचिवालयाने जाहीर केले आहे. हे हिवाळी अधिवेशन १९ डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. वेळापत्रकानुसार, पहिल्या दिवशी पुरवणी मागण्या सादर केल्या जातील. यानंतर १० आणि ११ डिसेंबर रोजी या मागण्यांवर चर्चा होणार आहे. पुरवणी मागण्यांवर ११ डिसेंबर रोजी मतदान घेऊन त्या मान्य केल्या जातील. अधिवेशनाच्या कामकाजाला १३ आणि १४ डिसेंबर रोजी सुटी असेल. दुसऱ्या आठवड्यात शासकीय कामांचे नियोजन आहे. अखेरच्या दिवशी म्हणजेच १९ डिसेंबर रोजी अशासकीय कामकाज पूर्ण केले जाईल.

महाराष्ट्रात पुढील काही आठवड्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांचा प्रभाव अधिवेशनाच्या कामकाजावर दिसेल. राज्यातील शेतकरी अतिवृष्टीमुळे संकटात आहे. यामुळे अधिवेशनात या विषयावर चर्चेची शक्यता आहे. शासनाकडून शेतकऱ्यांसाठी काही घोषणा होतात का ? याकडे अनेकांचे लक्ष आहे.

अधिवेशनाआधी परंपरेनुसार सर्वपक्षीय बैठक होईल. यानंतर विधिमंडळाच्या कामकाजाचे अंतिम नियोजन केले जाईल. वेळापत्रकावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब झाले की त्याची औपचारिक घोषणा केली जाईल.

Comments
Add Comment