
मुंबई : 'बिग बॉस मराठी सीझन ५'चा विजेता सूरज चव्हाणच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरु आहे. नुकतीच कोकण हार्टेड गर्ल अंकिता प्रभू वालावकर हिने एक आनंदाची बातमी शेअर केली...
"सूरजचं लग्न ठरलं आहे!" अंकिताने स्वतः सूरजच्या गावाला भेट देऊन त्याच्यासोबत आणि त्याच्या होणाऱ्या पत्नीसोबत काही खास क्षण घालवले. या भेटीतले फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर करत ही बातमी चाहत्यांपर्यंत पोहोचवली.
या बातमीनंतर चाहते सूरजच्या होणाऱ्या पत्नीविषयी अधिक जाणून घेण्यास उत्सुक झाले आहेत. सूरजची होणारी बायको कशी दिसते ? तिचं नाव काय? ती काय करते? आणि लग्न कधी होणार?
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडीओमध्ये सूरजच्या होणाऱ्या पत्नीची पहिली झलक पाहायला मिळाली आहे. व्हिडीओमध्ये सुरजचं कुटुंब, अंकिता आणि सूरजच्या होणाऱ्या पत्नीमध्ये मजेशीर संवाद साधताना आणि मजेशीर खेळ खेळताना दिसत आहेत.
सूरजच्या ताईने एक गंमतीशीर खुलासा केला आहे, सूरजचं लग्न त्याने स्वतः ठरवलं आहे, असं त्यांनी सांगितलं. विशेष म्हणजे साखरपुडा, हळद आणि लग्न हे तिन्ही सोहळे एकाच दिवशी पार पडणार आहेत.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमधून सूरजच्या होणाऱ्या पत्नीचा पहिला चेहरा पाहायला मिळाल्याने त्याच्या चाहत्यांकडून कमेंट्सचा पाऊस पडत आहे. सर्वानी त्याचे भरभरून कौतुक केले आहे.
अंकिता वालावकरने तिच्या पोस्टमध्ये, "सूरजला खूप शुभेच्छा! लग्नाला येणं शक्य नाही, म्हणून ही खास भेट," असं कॅप्शन देत फोटो शेअर केले होते. मात्र, त्या फोटोंमध्ये सूरजच्या होणाऱ्या पत्नीचा चेहरा इमोजीने झाकलेला होता.