
शिर्डी : केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साईबाबा समाधी मंदिराला भेट देऊन साईबाबांचे दर्शन घेतले. यानंतर त्यांनी गुरूस्थानचे दर्शन घेतले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही साईबाबा समाधीचे दर्शन घेतले. त्यांच्यासमवेत जलसंपदा मंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदा मंत्री (विदर्भ, तापी व कोकण पाटबंधारे विकास महामंडळ) गिरीश महाजन, पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे, ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे उपस्थित होते.
महाराष्ट्र के शिरडी साईं धाम में साईं बाबा के दर्शन कर सभी की सुख, समृद्धि की कामना की। महाराष्ट्रातील शिर्डी साई धाम येथे साईबाबांचे दर्शन पूजन करुन सर्वांच्या सुख आणि समृद्धीची कामना केली. pic.twitter.com/GJUmnvkxc1
— Amit Shah (@AmitShah) October 5, 2025
साईबाबा संस्थानच्यावतीने केंद्रीय मंत्री शाह यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर उपस्थित होते.