
कल्याण (प्रतिनिधी): कल्याण पूर्वेतील सूचक नाका परिसरात धक्कादायक घटना समोर आली आहे. खेळता खेळता डम्पिंगच्या कचऱ्यातील गुलाबजाम खाल्ल्याने मुलीची प्रकृती बिघडली आहे. या मुलीचे नाव अनिता चंद्रवंशी असून तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कल्याण- डोंबिवली महानगरपालिकेच्या वतीने सूचक नाका टेकडीवर कचरा टाकला जात असून या डम्पिंग ग्राउंडला नागरिकांचा विरोध आहे.

या डम्पिंग ग्राउंडमुळे नागरिक कचऱ्याच्या दुर्गंधीने त्रस्त असून, भरवस्तीत डम्पिंग नकोच अशी भूमिका नागरिकांनी घेतली आहे. कचरा टाकणं थांबवलं नाही तर उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते भारत सोनावणे यांनी दिला आहे.