Saturday, October 4, 2025

मुबंईत येत्या मंगळवारपासून तीन दिवस १० टक्के पाणीकपात

मुबंईत येत्या मंगळवारपासून तीन दिवस १० टक्के पाणीकपात

मुंबई : मुंबई महानगरपालिकेस पाणीपुरवठा करणाऱ्या पिसे, पांजरापूर येथील जलशुद्धीकरण केंद्रातील १०० किलोव्हॅट विद्युत केंद्रामधील विद्युत मीटर अद्ययावत करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. नियोजनानुसार, मीटर जोडणीचे काम ७ ते ९ ऑक्टोबर रोजी दररोज दुपारी १२.३० ते ०३.०० वाजेपर्यंत म्हणजेच अडीच तास केले जाणार आहे. त्यामुळे मंगळवार ७ ऑक्टोबर ते गुरुवार ९ ऑक्टोबर २०२५ असे तीन दिवस १० टक्के पाणी कपात केली जाणार आहे.

पूर्व उपनगरांतील एल विभाग (कुर्ला पूर्व), एन विभागात विक्रोळी, घाटकोपर व घाटकोपर पूर्व, एस विभागात भांडूप, नाहूर, कांजूरमार्ग आणि विक्रोळी पूर्व आणि टी विभागाात मुलुंड पूर्व आणि पश्चिम क्षेत्रात १० टक्के पाणी कपात लागू राहणार आहे. या परिसरातील नागरिकांनी उपरोक्त तीन दिवसांच्या कालावधीत पाण्याचा आवश्यक साठा करावा. काटकसरीने पाणी वापरुन सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

Comments
Add Comment