
सोलापूर : चिंचोली एमआयडीसीतील तुळजाई केमिकल्स कंपनीला शुक्रवारी ३ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी आग लागली. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले. आग लागण्याचे कारण समजलेले नाही. अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहोचताच लगेच आग नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार आग लागल्यावर थोड्याच वेळात आकाशाच्या उंचच उंच धुराचे लोट उठू लागले. लांबूनही आकाशाच्या दिशेने चाललेले धुराचे लोट दिसू लागले. अग्निशमन दलाच्या जवानांनी कंपनीतील सर्व कामगारांना सुरक्षितरीत्या बाहेर काढले. यानंतर कंपनीचा पूर्ण परिसर पोलिसांच्या मदतीने रिकामा करण्यात आला. अग्निशमन दल पाच बंबगाड्यांच्या मदतीने आग नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत.