Friday, October 3, 2025

गणपतीपुळे संस्थानकडून पूरग्रस्तांसाठी ४२ लाखाची मदत

गणपतीपुळे संस्थानकडून पूरग्रस्तांसाठी ४२ लाखाची मदत
रत्नागिरी : श्रीक्षेत्र गणपतीपुळे संस्थानकडून मराठवाड्यातील महापुरातील नुकसानग्रस्तांकरिता ४२ लाखाची मदत पाठविली आहे. मराठवाड्यातील विविध जिल्ह्यात आलेल्या महापुरामुळे नुकसान झालेल्यांना मदतीचा हात म्हणून मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 21 लाख आणि सेवा भारती (पश्चिम महाराष्ट्र) या संस्थेला 21 लाखांची मदत चेकद्रारे पाठवण्यात आली आहे. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीदेव गणपतीपुळे संस्थानच्या या सामाजिक निर्णयाचे कौतुक केले जात आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीस शितलादेवी-हनुमान मंदिर देवस्थान ट्रस्ट, केळवेचा दोन लाखांचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी श्री शितलादेवी व हनुमान मंदिर देवस्थान ट्रस्ट, केळवे तर्फे रुपये दोन लाखांचा धनादेश जिल्हाधिकारी माननीय इंदूराणी जाखड यांच्याकडे प्रदान करण्यात आला. राज्यातील तब्बल ६० लाख हेक्टर शेती क्षेत्रावर नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्तवला आहे. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी हा सदर देणगीमागचा प्रमुख हेतू असल्याचे ट्रस्टतर्फे सांगण्यात आले. श्री शितलादेवी व हनुमान मंदिर देवस्थान ट्रस्ट, केळवे हे दरवर्षी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस योगदान देत असून, आरोग्य व शिक्षण विषयक विविध उपक्रम सातत्याने राबवित आहे. नुकतेच गुणवंत गरीब व गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करण्यात आली. तसेच कॅन्सर सारख्या दुर्धर आजारासाठी शासकीय रुग्णालयात उपचार घेणाऱ्या गरीब रुग्णांना देखील ट्रस्टतर्फे अनेक वर्षांपासून मदत केली जाते. या उपक्रमाचा लाभ आजपर्यंत अनेक रुग्णांना मिळाला आहे.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >