Wednesday, October 1, 2025

जागतिक शाकाहारी दिन

जागतिक शाकाहारी दिन

आज १ ऑक्टोबर. जागतिक शाकाहार दिन. जगभर आजच्या दिवशी शाकाहार दिन साजरा करतात. शाकाहारी लोकं काय खाऊन प्रोटिन्स अर्थात प्रथिनं मिळवतात असा प्रश्न अनेकांना पडतो. याचे उत्तर आपल्या स्वयंपाकघरातच दडले आहे.

पनीर हा अनेकांच्या आवडीचा पदार्थ आहे. पनीर वापरुन शाकाहारींसाठी अनेक रुचकर पदार्थ तयार करणे शक्य आहे. पनीर हे अनेक पोषक घटकांनी समृद्ध असते त्यामध्ये प्रथिने, कॅल्शियम भरपूर असते. पनीरपासून ऊर्जा, ताकद, शरीराला मिळते. पनीरचा उपयोग हा रोजच्या जेवणात केल्याने जेवण पौष्टिक, संतुलित, रुचकर बनते.

पनीरचे अनेक फायदे आहेतच पण त्याच बरोबर त्याच्या चवींमध्येही अनेक प्रकार पडतात. पनीरपासून अनेक वेगवेगळे पदार्थ बनवता येतात. ग्रिल्ड, फ्राईड , सॅलेड , वेगवेगळ्या भाज्या, इ. मध्ये वापर केला जातो. या सर्वांची चव खूप उत्तम असतेच त्याचबरोबर रुचकर व पौष्टिक असते. वेगवेगळ्या प्रदेशानुसार तिथेले मसाले त्यात एकजीव होतात त्यामुळे पनीरचा दर्जा अधिक वाढतो.

जागतिक शाकाहारी दिन तुम्ही हे पदार्थ खाऊ शकता :

१. दक्षिण भारतीय पालक पनीर नारळाच्या दुधासह २. पनीर चिल्ली ६५ ३. पौष्टिक पनीर रोल ४. मसाला पोडीसोबत कुरकुरीत पनीर पॉपकॉर्न ५. पनीर लबाबदार

Comments
Add Comment