Tuesday, September 30, 2025

मेलोनींच्या आत्मचरित्राला पंतप्रधान मोदींची प्रस्तावना

मेलोनींच्या आत्मचरित्राला पंतप्रधान मोदींची प्रस्तावना

नवी दिल्ली : इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्या ‘आय एम जॉर्जिया - माय रूट्स, माय प्रिन्सिपल्स’ या आत्मचरित्राच्या भारतीय आवृत्तीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रस्तावना लिहिली आहे. ‘मन की बात’ या रेडिओ कार्यक्रमाचा संदर्भ देत पंतप्रधान मोदींनी या पुस्तकाचे वर्णन ‘मेलोनींची मन की बात’ असे केले आहे. मोदी यांनी मेलोनी यांचा वैयक्तिक आणि राजकीय प्रवास भारतीय लोकांसाठी प्रेरणादायी असल्याचे प्रस्तावनेत म्हटले आहे. मोदी यांनी या प्रस्तावनेत मेलोनी यांचे वर्णन असामान्य समकालीन नेत्या असे केले आहे. त्यांचा वैयक्तिक व राजकीय प्रवास भारतीयांच्या मनात खोलवर प्रतिध्वनित होतो. या पुस्तकासाठी प्रस्तावना लिहिणे ही ‘सन्मानाची गोष्ट’ आहे, असे गौरवोद्गार काढले आहेत.

Comments
Add Comment