
डोंबिवली : उघड्या नाल्याच्या चेंबरमध्ये पडून १४ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना रविवार २८ तारखेला रात्री आठ वाजण्याच्या सुमारास डोंबिवली प. गोपीनाथ चौकातील जगदंबा मदिराजवळ घडली.
एमएमआरडीकडून या ठिकाणी रिंगरूटचे काम सुरु आहे. नाल्यावर झाकण टाकण्याची जबाबदारी त्यांची होती. जर झाकण असते तर माझा मुलाचा यात पडून जीव गेला नसता असे मुलाचे वडील एकनाथ कदम यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. आयुष कदम असे मृत पावलेल्या मुलाचे नाव आहे.
नवरात्रीउत्सवनिमित्त याठिकाणी भंडारा ठेवण्यात आला होता. त्यावेळी आयुष याठिकाणी गेल होता खूप वेळ होऊन गेला तरी आयुष घरी आला नाही म्हणून कुटुंबियांनी त्याचा शोध सुरु केला. एमएनआरडीएकडून रिंगरूटचे काम सूरू होते. कामाच्या ठिकाणी नालाच्या चेंबरवर झाकण लावण्यास मात्र ठेवण्यास लक्ष नव्हते.
उघड्या चेंबरमध्ये आयुष पडला होता, याची माहिती मिळताच विष्णूनगर पोलीस ठाण्यातील पोलीस व अग्निशमन दलातील जवान आले. अग्निशमन दलाच्या जवानांकडे चेंबरमध्ये उतरण्यास आवश्यक साहित्य नसल्याचे नागरिकांनी सांगितले.
या घटनेला एमएमआरडीए जबाबदार असून शासनाने कदम कुटुंबियांना २५ लाखांची मदत करावी अशी मागणी केली आहे. दरम्यान, कल्याण- डोंबिवलीतील रस्त्याचे काम सुरु असून अनेक ठिकाणी नाल्यावरील चेंबर उघडे आहे. प्रशासनाने यावर गंभीर्याने लक्ष देऊन चेबरला झाकण लावावे असे नागरिक म्हणत आहे.