Monday, September 29, 2025

अहिल्यानगर : कोटलामध्ये दगडफेक करणाऱ्यांवर पोलिसांचा लाठीमार

अहिल्यानगर : कोटलामध्ये दगडफेक करणाऱ्यांवर पोलिसांचा लाठीमार

अहिल्यानगर : अहिल्यानगरमधील कोटला गावातील कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत तणाव वाढला. दुर्गा मातेची मिरवणूक सुरू असताना भाविकांवर दगडफेक झाली. धार्मिक भावना दुखावल्याची तक्रार करत मुसलमानांनी रास्ता रोको केले. पोलिसांनी रास्ता रोको करणाऱ्या आणि अधूनमधून दगडफेक करणाऱ्यांना शांत राहण्याचे आणि रस्ता मोकळा करण्याचे आवाहन केले. पोलिसांनी वारंवार आवाहन करुनही रास्ता रोको करणारे अधूनमधून दगडफेक करत होते. त्यांनी रस्ता पण अडवून धरला होता.

तणाव वाढू लागल्यामुळे पोलिसांनी लाठीमार केला. रस्ता मोकळा करण्यात आला. काही जणांना ताब्यात घेण्यात आले. पोलिसांच्या या कठोर कारवाईमुळे लवकरच परिस्थिती नियंत्रणात आली. पुन्हा परिस्थिती बिघडू नये यासाठी पोलिसांनी सार्वजनिक ठिकाणी असलेल्या बंदोबस्तात वाढ केली आहे.

कोटला गावात नेमके काय घडले याची माहिती कोतवाली पोलीस ठाण्याच्या एका अधिकाऱ्याने प्रसारमाध्यमांना दिली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एक रांगोळी बघून धार्मिक भावना दुखावल्याची तक्रार करत दगडफेक करण्यात आली. रास्ता रोको पण करण्यात आला. पोलिसांनी ज्या रांगोळीवरुन वाद झाला ती रांगोळी काढणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. तातडीने कारवाई करण्यात आली तरी रस्ता अडवून धरणारे हटत नव्हते आणि अधूनमधून दगडफेक करत होते. यामुळे परिस्थिती चिघळली. अखेर पोलिसांनी कठोर कारवाई करुन परिस्थितीवर नियंत्रण मिळवले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा