Sunday, September 28, 2025

मुंबईकरांना पाण्याचे नो टेन्शन!

मुंबईकरांना पाण्याचे नो टेन्शन!

धरणांमध्ये ९९.१३ टक्के पाणीसाठा

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सर्व धरण आणि तलावांमधील पाणीसाठा आता वाढत चालला असला तरी २७ सप्टेंबर रोजी जमा झालेला साठा मागील दोन वर्षां तुलनेत कमी दिसून येत आहे. यंदा जुलै महिन्यांतच सर्व तलाव भरुन वाहू लागल्याने मागील दोन वर्षांच्या तुलनेत सर्वाधिक पाणीसाठा जमा झाल्यानंतरही अजूनही या सर्व धरणांमध्ये एकूण ९९.१३ टक्के पाणीसाठा आहे, तर मागील दोन वर्षांत अनुक्रमे ९९.३८ टक्के आणि ९९.९९ टक्के एवढा पाणीसाठा जमा झाला होता. त्यामुळे तलाव क्षेत्रात पाणीसाठा काठोकाठ असल्याने तीन दिवसांसह अतिरिक्त पाणीसाठा जमा झाल्यास मुंबईकरांना वर्षभराच्या पाण्याचे कोणतेचे टेन्शन राहणार नाही.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या अप्पर वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या सर्व धरणांमधील पाणी साठा हा १४ लाख ३४ हजार ७९० दशलक्ष लिटर अर्थात १लाख ४२ हजार ४१६ कोटी लिटर एवढा जमा झाला आहे. मुंबईकरांची वर्षभराची तहान भागवण्यासाठी लागणाऱ्या १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर अर्थात १ लाख ४४ हजार ७३६ कोटी लिटर एवढा पाणीसाठा आवश्यक असतो. त्या तुलनेत आता या सर्व धरणांमध्ये ९९.१३ टक्के एवढा पाणीसाठा जमा झाला आहे. मुंबईला होणाऱ्या पाणीपुरवठ्याचे नियोजन हे १ ऑक्टोबरपर्यंत जमा होणाऱ्या पाणीसाठ्याच्या आधारे केले जाते. त्यामुळे येत्या १ ऑक्टोबर २०२५ रोजी जो पाणीसाठा असेल त्यावर मुंबईच्या वर्षभरातील पुरवठ्याचे नियोजन केले जाणार आहे. त्यामुळे सध्या ९९.१३ टक्के एवढा पाणीसाठा असला तरी पुढील तीन दिवसांमध्ये तलाव तथा धरण क्षेत्रात किती पाणीसाठा वाढतो याकडे सर्वांचे लक्ष आहे.

जुलै महिन्यांपासूनच या सर्व तलावांमधील पाणीसाठा हा मागील दोन वर्षांच्या तुलने दुपटीने पुढे होता. त्यामुळे ऑगस्ट महिन्यांमध्येच सर्व धरणे भरुन वाहू लागली होती. परंतु १७ सप्टेंबरच्या आकडेवारीनुसार सन २०२४ आणि सन २०२३ च्या तुलनेत सध्याचा पाणीसाठा कमी दिसून येत आहे. सध्या मागील दोन वर्षांच्या बरोबरीने किंवा त्याही पुढे हा पाणीसाठा दिसून येत नसून मुंबईकरांची पूर्ण तहान भागावण्यासाठी अजुन तीन ते चार दिवसांचा पाणी साठा दूर आहे.

२७ सप्टेंबर रोजीचा मागील तीन वर्षांतील पाणीसाठा

  • सन २०२५ : ९९.१३ टक्के (१४ लाख ३४ हजार ७९० दशलक्ष लिटर)
  • सन २०२४ : ९९.३८ टक्के (१४ लाख ३८ हजार ३९८ दशलक्ष लिटर)
  • सन २०२३ : ९९.९९ टक्के (१४ लाख ४२ हजार ३९४ दशलक्ष लिटर).
Comments
Add Comment