Sunday, September 28, 2025

आज, उद्या राज्यात मुसळधारेचा इशारा

आज, उद्या राज्यात मुसळधारेचा इशारा

५ ऑक्टोबरपर्यंत नैऋत्य मोसमी पावसाचा महाराष्ट्रात ठिय्या

मुंबई (प्रतिनिधी) : बंगालच्या उपसागरात तपार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट‌धामुळे मुंबईसह महाराष्ट्रात पुन्हा जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. राज्यातील बहुतांश भागात औरंज अलर्ट देण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाने २९ सप्टेंबरपर्यंत महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. महाराष्ट्र सरकारच्या माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाने म्हटले आहे की, राज्यात ५ ऑक्टोबरपूर्वी नैऋत्य मोसमी पाऊस परतण्याची शक्यता नाही.

दक्षिण विदर्भ आणि मराठवाड्याला लागून असलेल्या प्रदेशांमध्ये काल दुपारपासून पाऊस सुरू आहे. मराठवाडा व विदर्भातील इतर जिल्ह्यांमध्येहलका पाऊस व ढगाळ वातावरण राहू शकते. याव्यतिरिक्त, मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे घाट प्रदेश, कोल्हापूर घाट प्रदेश, सातारा घाट प्रदेश, नांदेड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यांमध्ये असाच मुसळधार पाऊस राहण्याची शक्यता आहे.

प्रशासनाची तयारी : राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने सर्व स्थानिक प्रशासनाला सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण होण्याचा धोका असल्याने नागरिकाना सतर्कतेचे आवाहन केले आहे. आपत्कालीन परिस्थितीत त्वरित मदतीसाठी आपत्कालीन संपर्क क्रमांकांवर संपर्क साधण्याचे सांगण्यात आले आहे. मंत्रालयीन स्तरावरील राज्यस्तरीय आपत्कालीन कार्य केंद्रावरील अधिकारी, कर्मचारी हे चोवीस तास (२४४७) उपलब्ध कार्यरत आहेत. राज्य आपत्कालीन कार्य केंद्राचे संपर्क क्रमांकः ०२२-२२०२७९९०, ०२२-२२७९४२२९, ०२२-२२०२३०३९, ९३२१५८७१४३.

Comments
Add Comment