
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आठ आणि नऊ ऑक्टोबर असे दोन दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. मेट्रो ३ च्या अंतिम टप्प्याचे आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे लोकार्पण करण्यासाठी पंतप्रधान मोदी राज्याच्या दौऱ्यावर येणार असल्याचे समजते. याच दौऱ्यात पंतप्रधान मोदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करतील. तसेच राज्यातील पूरग्रस्त भागात सुरू असलेल्या मदतकार्याचा आढावा घेतील, असेही समजते.
मुंबईतला मेट्रो ३ हा प्रामुख्याने भूमिगत मेट्रो मार्ग आहे. आरे मेट्रो कारशेड ते कफ परेड या मार्गावर धावणारी मेट्रो ही मेट्रो ३ म्हणून ओळखली जाते. ही मेट्रो उत्तर आणि दक्षिण मुंबईला जोडते. या मेट्रोच्या अंतिम टप्प्याचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होईल. नवी मुंबई येथे असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचे लोकार्पण पण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होईल.
पंतप्रधान मोदींच्या हस्ते मेट्रो ३ च्या अंतिम टप्प्याचे आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे लोकार्पण होईल. यानंतर पंतप्रधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार असल्याचे वृत्त आहे. पंतप्रधान मोदी राज्यातील पूरग्रस्त भागात सुरू असलेल्या मदतकार्याचा आढावा घेणार असल्याचेही समजते.+