Friday, September 26, 2025

भाईजानने एक्स गर्लफ्रेंड कतरिनाला दिल्या शुभेच्छा?

भाईजानने एक्स गर्लफ्रेंड कतरिनाला दिल्या शुभेच्छा?

अभिनेत्री कतरिना कैफ हिने काही दिवसांपूर्वी चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. कतरिना आणि विकी लवकरच आई-बाबा होणार आहेत. वयाच्या ४२ व्या वर्षी कतरिना प्रेग्नेंट आहे. तिने विकीसोबतचा एक खास फोटो पोस्ट करत चाहत्यांना गुड न्यूज दिली. या फोटोमध्ये कतरिनाचं बेबी बंप पाहायला मिळतंय. तिच्या पोस्टनंतर अनेकांनी कतरिनाला शुभेच्छा दिल्या. तिची पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली.

भाईजान सलमान खाननेही एक्स गर्लफ्रेंड कतरिना कैफला शुभेच्छा दिल्याची पोस्ट व्हायरल होत आहे. कतरिनाचा हा फोटो भाईजानने शेअर करत तिला शुभेच्छा दिल्या असल्याचं पोस्टमध्ये दिसत आहे. पण, खरं तर सलमानच्या अकाऊंटवर अशी कोणतीही पोस्ट दिसत नाही. त्यामुळे हा फोटोच फेक असल्याचं समजत आहे. AI द्वारे भाईजानचे इन्स्टाग्राम प्रोफाइल कॉफी करून पोस्ट व्हायरल करण्यात आली आहे. सलमान आणि कतरिनाच्या जुन्या नात्यामुळे ही पोस्ट एडिट करण्यात आल्याचं बोललं जातंय.

Comments
Add Comment