Tuesday, September 23, 2025

फ्लिपकार्ट बीबीडी सेलमध्ये आधी ऑर्डर केला आयफोन, नंतर झाला रद्द

फ्लिपकार्ट बीबीडी सेलमध्ये आधी ऑर्डर केला आयफोन, नंतर झाला रद्द

मुंबई : सध्या सुरू असलेल्या फ्लिपकार्ट बिग बिलियन डे (बीबीडी) सेल मध्ये आयफोन १६ आणि आयफोन १६ प्रो मॉडेल्ससाठी दिल्या गेलेल्या आकर्षक सवलतींमुळे ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. २२ सप्टेंबर रोजी ब्लॅक आणि प्लस सदस्यांसाठी हा सेल सुरू झाला आणि २३ सप्टेंबरपासून सर्व वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे. मात्र, अनेक ग्राहकांनी ऑर्डर देऊन पैसे भरल्यानंतर काही तासांतच त्यांची ऑर्डर रद्द झाल्याची तक्रार केली आहे.

फ्लिपकार्टच्या सेल पेजनुसार, आयफोन १६ (१२८ जीबी व्हेरिएंट) ची प्रभावी किंमत 51,999 रुपये असून, आयफोन १६ प्रो (१२८ जीबी) ची किंमत 69,999 रुपये अशी होती. या सवलतींच्या जाहिरातींमुळे हजारो ग्राहकांनी लगेच ऑर्डर दिल्या, परंतु काही तासांत ऑर्डर रद्द होण्याची घटना घडली. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर, विशेषतः एक्स वर अनेक ग्राहकांनी फ्लिपकार्टच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे.

एका ग्राहकाने म्हटले की, “मी फ्लिपकार्टवर ३ ऑर्डर दिल्या, परंतु त्या ४ तासांत रद्द केल्या गेल्या. हे घोटाळ्यासारखे वाटते!” दुसऱ्या वापरकर्त्याने पोस्ट केले, “बीबीडी सेल सुरू होताच आयफोन १६ आणि १६ प्रोचे ऑर्डर यशस्वीरित्या देण्यात आले, परंतु आज सकाळी अचानक रद्द करणे, हे ग्राहकांशी छळ करण्यासारखे आहे.” यावेळी काही वापरकर्त्यांच्या डिव्हाइस पाठवण्यात आलेले असले तरी अद्याप ते डिलिव्हर झालेले नाहीत. मात्र, काही ग्राहक अजूनही फ्लिपकार्टच्या सेवांबाबत विश्वास ठेवत आहेत.फ्लिपकार्टने अद्याप या प्रकरणावर अधिकृत विधान जारी केलेले नाही.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा