Tuesday, September 23, 2025

जुलै महिन्यात EPFO सदस्य नोंदणीत 'इतक्या' लाखांची वाढ

जुलै महिन्यात EPFO सदस्य नोंदणीत 'इतक्या' लाखांची वाढ

प्रतिनिधी:आज जाहीर झालेल्या नवीनतम वेतन आकडेवारीनुसार, जुलै २०२५ मध्ये सेवानिवृत्ती निधी संस्था ईपीएफओने (EPFO) ने २१.०४ लाख निव्वळ सदस्यांची भर घातली आहे जी मागील वर्षाच्या तुलनेत इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) ५.५५% वाढली आहे.कामगार मंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे की, रोजगाराच्या वाढत्या संधी, कर्मचाऱ्यांच्या फायद्यांबद्दल वाढती जागरूकता आणि ईपीएफओच्या यशस्वी आउटरीच कार्यक्रमांमुळे जुलै २०२५ मध्ये कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) सुमारे ९ .७९ लाख नवीन सदस्यांची नोंदणी केली होती. जुलै २०२४ च्या तुलनेत वार्षिक विश्लेषणात निव्वळ वेतन वाढीमध्ये ५.५५% वाढ दिसून आली आहे असे संस्थेने म्हटले. ही ईपीएफओच्या प्रभावी उपक्रमांमुळे वाढलेल्या रोजगाराच्या संधी आणि कर्मचाऱ्यांच्या फा यद्यांबद्दल जागरूकता दर्शवते, असे निवेदनात म्हटले आहे.

जुलै २०२५ मधील आकडेवारीनुसार ,१८-२५ वयोगटातील ५.९८ लाख नवीन सदस्य ईपीएफओने जोडले आहेत जे जुलै २०२५ मध्ये जोडलेल्या एकूण नवीन सदस्यांपैकी ६१.०६% आहेत.शिवाय जुलै २०२५ मध्ये १८-२५ वयोगटातील निव्वळ वेतनवाढ अंदाजे ९.१ ३ लाख होती, जी जुलै २०२४ मध्ये मागील वर्षाच्या तुलनेत ४.०९ % वाढ दर्शवते, तसेच मुख्य निरीक्षण म्हणजे संघटित वर्कफोर्स सामील होणारे बहुतेक व्यक्ती तरुण वयोगटातील आहेत जे प्रामुख्याने पहिल्यांदाच नोकरी शोधणारे आहेत.जुलै २०२५ मध्ये सुमारे १ ६.४३ लाख सदस्य ईपीएफओमध्ये पुन्हा सामील झाले. जुलै २०२४ च्या तुलनेत ही आकडेवारी वर्षानुवर्षे १२.१२ टक्के लक्षणीय वाढ दर्शवते. निरीक्षणानुसार, या सदस्यांनी त्यांच्या नोकऱ्या बदलल्या आणि ईपीएफओच्या कक्षेत येणाऱ्या आस्थापनांमध्ये (Establish ment) पुन्हा सामील झाले आणि अंतिम सेटलमेंटसाठी अर्ज करण्याऐवजी त्यांचे संचय हस्तांतरित करण्याचा पर्याय निवडला, अशा प्रकारे दीर्घकालीन आर्थिक कल्याणाचे रक्षण केले आणि त्यांचे सामाजिक सुरक्षा संरक्षण वाढवले.

महिन्यांचा बाबतीत बघितल्यास जुलै २०२५ मध्ये सुमारे २.८० लाख नवीन महिला सदस्य ईपीएफओ मध्ये सामील झाल्या. शिवाय या महिन्यात निव्वळ महिला वेतनवाढ सुमारे ४.४२ लाख होती, जी जुलै २०२४ च्या तुलनेत वर्षानुवर्षे ०.१७% वाढ आहे. महिला सद स्यांच्या संख्येत झालेली वाढ अधिक समावेशक आणि वैविध्यपूर्ण कार्यबलाकडे होणाऱ्या व्यापक बदलाचे संकेत देते.राज्यनिहाय वेतनवाढीच्या आकडेवारीचे विश्लेषण करताना अहवालात असे दिसून आले आहे की निव्वळ वेतनवाढीच्या सुमारे ६०.८५ % हिस्सा शीर्ष पाच राज्ये/केंद्रशासित प्रदेशांचा आहे, ज्यामुळे महिन्यादरम्यान एकूण १२.८० लाखांची भर पडली.

सर्व राज्यांपैकी महिन्यादरम्यान निव्वळ वेतनवाढीच्या २०.४७% भर घालून महाराष्ट्र आघाडीवर आहे.महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, गुजरात, हरियाणा, दिल्ली, तेलंगणा आणि उत्तर प्रदेश या राज्ये/केंद्रशासित प्रदेशांनी महिन्यादरम्यान एकूण निव्वळ वेतनवा ढीच्या ५% अधिक भर घातली आहे.अहवालातील माहितीनुसार,उद्योगनिहाय डेटाची महिन्या-दर-महिना (Monthly Basis) तुलना केल्यास लोहखनिज खाणकाम, विद्यापीठे, बीडी उत्पादन, कपडे उत्पादन, रुग्णालये, व्यावसायिक व्यापार आणि ट्रॅव्हल एजन्सी यासारख्या विविध उद्योगांमध्ये गुंतलेल्या आस्थापनांमध्ये निव्वळ वेतनवाढीमध्ये लक्षणीय वाढ दिसून येते.

एकूण निव्वळ सदस्यांपैकी सुमारे ४०.२१ टक्के सदस्य तज्ज्ञ सेवांमधून (Service Sector) आहेत. अहवालाच्या म्हणण्यानुसार,वेतनवाढीचा डेटा तात्पुरता (Provisional) आहे कारण डेटा निर्मिती ही एक सतत प्रक्रिया आहे, ज्यामध्ये कर्मचाऱ्यांच्या नोंदींचे सतत अपडेट केले जाते. एप्रिल २०१८ पासून, ईपीएफओ सप्टेंबर २०१७ पासूनच्या कालावधीसाठी वेतनवाढीचा डेटा जारी करत आहे.

मासिक वेतनवाढीच्या डेटामध्ये आधार प्रमाणित (Aadhar Linked) युनिव्हर्सल अकाउंट नंबर (यूएएन) द्वारे प्रथमच ईपीएफओमध्ये सामील झालेल्या सदस्यांची संख्या, ईपीएफओच्या कव्हरमधून बाहेर पडणारे विद्यमान सदस्य आणि बाहेर पडलेल्या परंतु सद स्य म्हणून पुन्हा सामील झालेल्या सदस्यांची संख्या निव्वळ मासिक वेतनवाढीमध्ये पोहोचते.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >