Saturday, September 20, 2025

Navratri 2025 : नवरात्रोत्सवात गरबा फक्त हिंदूंसाठीचं, मुस्लिमांना 'नो एंट्री' ,विश्व हिंदू परिषदेची कठोर सूचना

Navratri 2025 : नवरात्रोत्सवात गरबा फक्त हिंदूंसाठीचं, मुस्लिमांना 'नो एंट्री' ,विश्व हिंदू परिषदेची कठोर सूचना

नागपुर : देशभरात उत्साहाने सुरू होणाऱ्या शारदीय नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागपुरातून एक मोठी अपडेट समोर आली आहे. सोमवार, २२ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या नवरात्रोत्सवात घरोघरी घट बसतील, देवीची आराधना केली जाईल आणि गरबा महोत्सवाचे आयोजन देखील करण्यात येईल. परंतु, विश्व हिंदू परिषदेने नागपुरातील गरबा आयोजकांना दिलेल्या सूचनेनुसार, गरब्यात फक्त हिंदू सहभागी होऊ शकतात; मुस्लिमांना प्रवेश देऊ नये, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. याशिवाय, गरब्यासाठी प्रवेश देताना आधार कार्ड तपासणे अनिवार्य असल्याचंही सांगण्यात आले आहे. जर मुस्लिम तरुण गरब्यात सामील झाले तर त्यांना पोलिसांच्या ताब्यात देण्याची सूचना दिली गेली आहे. यासोबतच, बजरंग दल आणि विहिंप यांच्या कार्यकर्त्यांची यावर कडक नजर ठेवली जाणार असल्याचेही माहिती मिळाली आहे. या निर्णयामुळे स्थानिक समाजात आणि सामाजिक माध्यमांवर चर्चेला सुरुवात झाली असून, उत्सवाच्या पारंपरिक आणि सर्वसमावेशक स्वरूपावर प्रश्न उपस्थित केला जात आहे.

विहिंपचा इशारा : आधार कार्ड तपासूनच गरब्यात प्रवेश द्या

नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागपुरमध्ये आयोजित गरबा उत्सवावर विश्व हिंदू परिषद (विहिंप) आणि बजरंग दल यांच्याकडून ठळक सूचना देण्यात आल्या आहेत. विहिंपने गरबा आयोजकांना स्पष्ट सांगितले आहे की, उत्सवात फक्त हिंदू सहभागी होऊ शकतात, मुस्लिम तरुणांना प्रवेश देऊ नये. विहिंपच्या माहितीनुसार, काही मुस्लिम तरुण गरबा उत्सवात लपून प्रवेश करून सहभागी होतात, असा आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे आधार कार्ड तपासूनच प्रवेश देणे अनिवार्य असल्याचेही सूचित करण्यात आले आहे. जर कोणत्याही मुस्लिम तरुणाने गरब्यात प्रवेश केला, तर त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्याचा इशारा विश्व हिंदू परिषदने दिला आहे. याशिवाय, येत्या काळात सर्व नवरात्र उत्सव आणि गरबा कार्यक्रमांवर बजरंग दल व विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांची कडक नजर राहणार आहे. या सूचनेसंदर्भात लवकरच पत्रकार परिषद घेऊन पोलिसांना अधिकृत सूचना आणि विनंती पत्र दिले जाणार असल्याचेही समजते.

Comments
Add Comment