Friday, September 19, 2025

२० तलवारींसह मुस्लिम तरुणाला अटक, कोणता कट शिजत होता?

२० तलवारींसह मुस्लिम तरुणाला अटक, कोणता कट शिजत होता?

जळगाव : दसरा-दिवाळीच्या सणासुदीच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांकडून कारवाया केल्या जात आहेत. याच दरम्यान जळगाव जिल्ह्यातल्या पाचोरा शहरात अवैधरित्या बाळगलेल्या २० तलवारी जप्त करून एका तरुणाला ही अटक करण्यात आली आहे. सोहेल शेख तब्युब शेख (वय २४, रा. स्मशान भूमी रोड, बाहेरपुरा, पाचोरा) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव असून या कारवाईत सुमारे ५४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पाचोरा पोलीस ठाण्याचे निरीक्षक राहुलकुमार पवार यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, माहिजी नाका परिसरात काही तलवारी विक्रीसाठी आणल्या जात आहेत.

त्या माहितीनुसार, माहिजी नाका परिसरात छापा टाकण्यात आला. यावेळी सोहेल शेख तब्युब शेख याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने तलवारी विक्रीसाठी आणल्याची कबुली दिली. त्याच्याकडून १८ तलवारी जप्त करण्यात आल्या. तर कारवाईपूर्वी विक्री केलेल्या २ तलवारीही पोलिसांनी संशयितांकडून हस्तगत केल्या आहेत.

या प्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ४६०/२०२५ नुसार भारतीय शस्त्र अधिनियम १९५९ च्या कलम ४, २५ आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७(१)(३), १३५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Comments
Add Comment