Wednesday, September 17, 2025

मुंबई मेट्रो स्टेशनवर आता तुमचा व्यवसाय सुरू करा! काय आहे ही योजना?

मुंबई मेट्रो स्टेशनवर आता तुमचा व्यवसाय सुरू करा! काय आहे ही योजना?

मुंबई: मुंबईतील उद्योजक, स्टार्टअप्स आणि व्यावसायिकांसाठी एक मोठी संधी उपलब्ध झाली आहे. महा मुंबई मेट्रोने (MMMOCl) मेट्रो लाईन २ए आणि ७ च्या स्टेशन परिसरात रिटेल स्पेस उपलब्ध करून देण्याची घोषणा केली आहे. अंधेरी (प.) ते दहिसर पूर्व आणि पुढे गुंदवलीपर्यंतच्या स्थानकांवर व्यवसाय करण्याची ही सुवर्णसंधी आहे.

अशी आहे ही योजना

महा मुंबई मेट्रोने मेट्रो स्टेशनवर व्यवसाय करण्यासाठी एकूण ४७२ किऑस्क, २५ प्राइम कमर्शियल ब्लॉक्स आणि तब्बल ६८,१६६ चौरस फूट रिटेल स्पेस उपलब्ध करून दिली आहे. ही जागा खासकरून उद्योजक आणि स्टार्टअप्सना प्रोत्साहन देण्यासाठी देण्यात येत आहे.

युवा उद्योजकांसाठी विशेष सवलत

या योजनेतील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, युवा उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी एकेरी किऑस्कच्या परवान्यासाठी कोणतीही टर्नओव्हर अट (turnover condition) ठेवलेली नाही. याचा अर्थ, केवळ तुमची व्यवसाय करण्याची कल्पना चांगली असल्यास तुम्हाला ही जागा मिळू शकते. यामुळे, ज्यांच्याकडे मोठी गुंतवणूक नाही, अशा तरुण व्यावसायिकांनाही त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याची संधी मिळेल.

महा मुंबई मेट्रोच्या मते, मेट्रो ही केवळ प्रवासासाठी नाही, तर नव्या संधींचे व्यासपीठ आहे. इच्छुक व्यावसायिक, स्टार्टअप्स आणि उद्योजक mahatenders.gov.in या वेबसाइटवर अर्ज करू शकतात. अधिक माहितीसाठी dgmco@mmmocl.co.in या ईमेलवर किंवा +९१ (२२) ३५००१८५४ या क्रमांकावर संपर्क साधता येईल.

Comments
Add Comment